ओरोस :
*भारत हा शेतीप्रधान देश आहे* आणि वैविध्यपूर्ण शेती ही फक्त महाराष्ट्रातच होते, कित्येक वर्षे अनेक मुलभूत सेवासुविधाना वंचित असलेला शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या कालखंडात सुखावला आहे, भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांच्या पीकधारणेपासून ते पीकविम्यापर्यंत, शेतअवजरांपासुन ते घरकुल व मांगर योजनेपर्यंत अनेक योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे.
या आधुनिक डिजिटल युगात शेतकऱ्यांना कंपनीधारक अर्थात मालक बनविण्याचा विडा उचलला आहे व त्याचेच पहिले पाऊल म्हणजेच एफपीओ (फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन) आणि याची सखोल माहिती देण्यासाठीच भारतीय जनता पार्टी – किसान मोर्चाने एफपीओ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत किसान मोर्चा पदाधिकाऱ्यांसह जे एफपीओ स्थापन करु इच्छित आहेत अशा नागरिकांनाही सहभागी केले जाणार आहे.
आज तरुणवर्ग शेतीकडे वळतोय त्यांना ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी ठरेल.
2 फेब्रुवारीला भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.गणेश उर्फ तात्या भेगडे यांचा वाढदिवस व त्याचेच औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला जात आहे. ही कार्यशाळा विनाशुल्क असेल. सोबतच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आयोजन असेल.
*सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5* वाजेपर्यंत.
स्थळ : *ओरोस शासकीय विश्रामगृह हाॅल, ओरोस, सिंधुदुर्गनगरी, सिंधुदुर्ग.*
*कार्यक्रमाची रुपरेषा*
संयोजन : कृषी आयडॉल *श्री. दादा सामंत*
नियोजन : *श्री.महेश सारंग, श्री.प्रसाद भोजने व श्री.गणेश सागवेकर*
सूत्रसंचालन : *सौ.ज्योती देसाई*
*Registration and Tea* (9am to 9.30am)
*स्वागत व मनोगत* (9.30am to 10am)
प्रस्तावना : *श्री.महेश संसारे* 3 min.
मनोगते :
1) *श्री. प्रभाकर सावंत* 5 min.
2) *श्री.प्रसन्न देसाई* 4 min.
3) *डाॅ.भाई बांदकर* 2 min.
4) *श्री.राजन चिके* 2 min.
5) *श्री.रामकृष्ण सावंत* 2 min.
6) *श्री.उमेश सावंत* 5 min.
*मार्गदर्शन :*
1) कंपनी स्थापना महत्व/रचना व कायदेशीर बाबी – (10am to 12pm) *श्री. वृषल शिंदे*
2) जिल्ह्यातील उत्पादन वस्तू संधी- (12pm to 1pm) *श्री.यशवंत (बापू ) पंडित*
3) प्रोडक्टीव्ह एफपीओ व मार्केटिंग एफपीओ यामधील ताळमेळ – (1pm to 2pm)
*डाॅ. भाई बांदकर*
*Lunch Break* (2pm to 2.30pm)
4) FPO रजिस्ट्रेशन व कायदेशीर बाबी – (2.30pm to 3.15pm) *ॲडव्होकेट सौ. धनश्री जोशी*
5) कंपनीकरिता शासकीय योजना आणि बँक सहकार्य – (3.15pm to 4pm) *डॉ आनंद तेंडुलकर*
6) कंपनीच्या व्यवस्थापनातील कायदेशीर व महत्वपूर्ण बाबी – (4pm to 4.30pm) *श्री.भूषण तेजम*
*चर्चासत्र*
सर्व सहभागी (4.30pm to 4.50pm)
*आभार*- *श्री. गुरुनाथ पाटील* (4.50pm to 5pm)
*Tea and Sendoff* (5pm to 5.30pm)
या कार्यक्रमास सिंधुदुर्गातील कंपनी स्थापन करु शेतकऱ्यांनी व संस्थानी उपस्थित रहावे असे आवाहन किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष डाॅ. भाई बांदकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : डाॅ. भाई बांदकर – Mo. 8080620715.