वेंगुर्ले :
वेंगुर्ले येथील श्री.त्रिंबक अंकुश आजगावकर. उच्च श्रेणी मुख्या. जि.प.शाळा केरवाडा शिरोडा आणि (साने गुरुजी कथामाला कार्यकर्ते) नियत वयोमाना नुसार दिनांक. ३१.०१.२०२४ ला सेवानिवृत्त होत आहेत. या वर्षी महाराष्ट्र माऊली सानेगुरुजींचे शतकोत्तर रोप्य महोत्सवी जन्मवर्ष असल्याने दिनांक ४ फेब्रु.२०२४ ला *साई मंगल कार्यालय* वेंगुर्ले येथे सकाळी ११.०० वाजता त्यांच्या कुटुंबियांकडून ग्रंथ तुलेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी *श्यामची आई* हा ग्रंथ निवडण्यात आला असून त्याकरिता त्यांनी *श्यामची आई* पुस्तकाच्या ३५० प्रती मागविल्या आहेत. ग्रंथ तुले नंतर आपल्या केंद्रातील सर्व शाळा, विद्यार्थी, माता यांना हे ग्रंथ मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. ‘वाचनसंस्कृती वाढीस लागावी, गुरुजींचे प्रेरणादायी विचार घरा घरांत जावेत’ हा त्या मागील हेतू! त्यांच्या सहधर्मचारिणी श्रीम. देवयानी आजगावकर आणि कुटुंबियांचे या कामी सहकार्य लाभले आहे.
सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश शा.ठाकूर यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करुन त्याना कथामाला परिवाराच्या वतीने सेवानिवृत्ती नंतरच्या सुखी समाधानी जीवना साठी शुभेच्छा दिल्या आहेत.