You are currently viewing सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया…

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया…

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया…

जिल्हा कार्यवाह नितीन वाळके,  मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर

मालवण

सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या आयोजनातून 36 वा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे 31 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने 29 व 30 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनस्थळी नियोजनाच्या दृष्टीने मालवण व्यापारी संघाच्या सर्व सभासद सदस्यांना ओळखपत्र देण्यात आली असून त्याचे प्रकाशन आणि वितरण शनिवारी सायंकाळी व्यापारी संघाच्या मालवण शहर येथील कार्यालयात कारण्यात आले.

दरम्यान, व्यापारी, युवा व्यापारी, महिला व्यापारी सर्वांनी उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया. असे आवाहन जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी केले.

यावेळी जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, मालवण अध्यक्ष उमेश नेरूरकर, नितीन तायशेटये, बाळू अंधारी, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, रवी तळाशीलकर, गणेश प्रभूलकर, हर्षल बांदेकर, अभय कदम, हरेश देऊलकर, अरविंद ओटवणेकर, शांती पटेल, संभव कुडाळकर, मंदार ओरसकर, रिया बांदेकर, संजीवनी कुडाळकर, स्मृती कांदळकर, अनिता निवेकर, मिनू देऊलकर, भाग्यश्री धारगळकर, गौरी पारकर, रिया कुडाळकर, लिरिसा मुणगेकर, मेधा रोड्रिक्स, नीलिमा आरोलकर, पूनम चव्हण, पूजा वाडकर, पूजा पारकर, राधिका मोंडकर, राणी भिसे, रसिका मयेकर, रोहिणी तायशेटये, रुचिदा फर्नांडिस, शितल सारंग, शिल्पा गाड, सिद्धी कवठकर, सोफिया फर्नांडिस, सुप्रिया पेंडूरकर, सुरेखा वाळके, नेहा कोळंबकर, समृद्धी धुरी, उषा यमकर, गौरी सावंत, संजना सावंत, अश्विनी कारेकर, निहार सापळे, अखिलेश शिंदे, हरेश देऊलकर, शांती पटेल, सचिन आरोलकर, विफूल प्रभूलकर, विनायक पारकर, अभिजित परब, शैलेश मालंडकर, राजेश पारकर, विवेक पारकर यासह युवा व महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

29 जानेवारी रोजी सायंकाळी माजी खासदार निलेश राणे यांच्या सौजन्याने सिने कलाकार यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येउद्या’ कार्यक्रम. 30 जानेवारी रोजी सायंकाळी महानाट्य अयोध्या, 31 जानेवारी ला व्यापारी एकता मेळावा होणार आहे. विक्रमी संख्येने जिल्ह्यातील व्यापारी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्या द्दूष्टीने नियोजन सुरु आहे. मालवण तालुक्यातील व्यापारी, युवा व्यापारी यासोबत महिला व्यापारी यांचा नियोजनातील सहभाग उत्स्फूर्त असल्याचे नितीन वाळके, उमेश नेरूरकर यांनी सांगितले.

जेष्ठ आदर्श व्यापारी यांचा होणार गौरव

मालवण व्यापारी संघ यांच्या परंपरेनुसार यंदाच्या व्यापारी मेळाव्यात मालवण तालुक्यातील आयुष्यभर व्यापारात कार्यरत असणाऱ्या जेष्ठ आदर्श व्यापारी बंधू भगिनी यांचा गौरव व्यापारी मेळाव्यात केला जाणार आहे. अशी माहिती नितीन वाळके, उमेश नेरूरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा