You are currently viewing ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा पुणे केंद्रातून ‘अहमेव ते वहिदा।’ प्रथम

६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा पुणे केंद्रातून ‘अहमेव ते वहिदा।’ प्रथम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून स्वरमाधव फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या ‘अहमेव ते वहिदा’ या नाटकाला प्रथम पारितोषिक आणि लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेच्या ‘तृतीयः’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या ‘वंचते परिवंचते’ या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पुणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक महिमा ठोंबरे (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक डॉ. तन्मय भोळे (तृतीयः), नाटयलेखन : प्रथम पारितोषिक पं. प्रभाकर भातखंडे (वंचते परिवंचते), द्वितीय पारितोषिक डॉ. तन्मय भोळे (तृतीयः), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक आर्या शिंगणे (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक चैतन्य गायधनी (वयमेव नान्ये), नेपथ्य : प्रथम पारितोषिक ऋषिकेश पाटील (अहमेव ते वहिदा), द्वितीय पारितोषिक संदीप पोरे (आहूतयः), रंगभूषा : प्रथम पारितोषिक स्वरांजली गुंजाळ (वन्दे गणपतिम्), द्वितीय पारितोषिक नरेंद्र वीर (अहमेव ते वहिदा), उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक स्त्री वैदेही मुळ्ये (वंचते परिवंचते), कल्याणी गोखले (ग्रहणमुक्ती) आणि उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष शौनक जोशी (अहमेव हे वहिदा), डॉ. तन्मय भोळे (तृतीयः), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रेणुका येवलेकर (अहमेव ते वहिदा), यशश्री जोशी (बिन्दुसन्देशः), डॉ. दीपलक्ष्मी भट (दिव्यदानम्), निकिता लोंढे (नारायणी), शर्वरी कानडे (आहूतयः), सागर संत (वयमेव नान्ये), रोहित ताराहर (माधवीयम्), यतिन माझिरे (आकार:), आभिजीत केळकर (त्वमेव केवलं कर्तासि), ऋषिकेश भोसले (वंचते परिवंचते)

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २१ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्वाती यज्ञोपवीत, मिताली मुसळे आणि सुहास जोशी यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या संस्कृत नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा