*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*’प्री वेडिंग केलच पाहिजे का?’*
*******************
विवाह म्हणजे एक संस्कार,म्हणून भारतीय संस्कृतीत विवाहाला खूप महत्त्व दिले गेले आहे.देव देवतांपासून तर आजतागायत विवाह प्रथा ही परंपरागत सुरूच आहे.रीतिरिवाजा प्रमाने विवाह संस्कार होत असतात. विवाह म्हणजे दोन कुटूंबाचे मिलन, एकमेकांचे एकमेकांशी नातेसंबंधी जुळने.मुला मुलीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणे.यानिमित्ताने दोन कुटूंब कायमचे एकत्र येतात.पण सध्या काळानुरूप विवाह प्रथा बदलत गेली, परंपरा रीतीरिवाज बदलतं गेले,संस्कार आणि संस्कृतीत बराच बदल झालेला जाणवतो.फेसबुक,इंटरनेट, मोबाईलच्या युगात माणसांमध्ये विचारा पलीकडे बदल झालेला दिसून येतो.शैक्षणीकदृष्टीने आजच्या नवीन पिढीतील मुल मुली शिक्षणाला जास्त महत्वा देतात म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आजची मुलं मुली प्रयत्नशील आहेत.त्यामुळे विवाह प्रथेची वयोमर्यादा वाढली.म्हणूनच आजच्या काळात मुलांची लग्नही उशीरा व्हायला लागलीय.शिवाय नवरी मुलींच्या पसंतीला अधीक महत्त्व प्राप्त झाले आहे.म्हणजे मुलगा जास्त शिकलेला सुदंर,आर्थीकद्रृष्टीने वरचढ तिच्या पेक्षा जास्त पगार असलेला तिच्या आवडीनिवडी हौसमौज करणारा,गाडी,बंगला व सर्व सुखसोयीने परिपूर्ण असलेला मुलगा असावा अस असेल तरचं विवाह योग जुळून येतो.अन्यथा मुलगा खूप शिकलेला असेल भरपूर पगार असेल पण स्वतःच घर नसेल किंवा परिस्थिती जर सर्वसाधारण असेल तर त्याला स्पष्टपणे नकार दिला जातो.नाहीतर पुर्वीच्या काळी योग्य वयात लग्न लाऊन मुलंमुली संसाराला लागत होते.कुठले हौसमौज नाही की कसलाच देखावा नाही.संगीत नाही की हल्ली मेहंदी नाही अगदीच साध्या पद्धतीने पुर्वी लग्न सोहळा होत असे.परंतू आता पुर्वीसारख राहिलं नाही. बदलत्या युगाची गती पाहून माणसं बदलत गेलीत किंबहुना बदलत आहेतं म्हणून बदलत्या विचारानुसार मुलं,मुली,माणसं वागत आहेत.खर पाहता मोबाईल आणि फॅशन,शिवाय जास्त शिक्षणामुळे मुलीं प्रमाणापेक्षा जास्त मुक्त विचारांनी अर्थात फास्टफॅर्वड झाली आहेत.त्यामुळे एकमेकांना समजून घेणे फारच कठीण झाले आहे.एकतर लवकर लग्न जमत नाही जमले तर ते निभावणं फारच कठीण झाले आहे.लग्ना नंतर अवघ्या सहा महिन्यांत घटस्फोट झाल्याचे वाचण्यात ऐकण्यात येते.याचा अर्थ मुलामुलींचे विचार त्या़ची माणसिकता कुठल्या स्थरावर त्यांना घेऊन चालली यांचा विचार करणं कठीण झाले आहे.लग्नानंतर मुलींच्या मनासारखं नाही झालं तर वादाला तोंड फुटते आणि मग शेवटी टोकाची भुमिका घेऊन विभक्त होण्याची वेळ येते. म्हणजे कोणीच कोणाला समजून घेत नाही.किंवा समजूतदारपणा कोणातही नसतो म्हणून मन जुळत नाही.याला कारण म्हणजे उच्चशिक्षण आणि भरगच्च पगाराचा माज अंगी असल्यामुळे कोणी कोणालाच जुमानत नाही.म्हणून लग्न प्रथेला सध्याच्या काळात वेगळे वळण लागले आहे.काही विवाह संबंध साखरपुड्यापर्यंतच असतात आणि मग काहीना काही कारणास्तव कुठेना कुठे तरी बिनस्त आणि संबंध तुटतात. काहींच तर बोलीबंधनातच बिनस्त शिवाय कुणाचे ना कुणाचे कुठेतरी काहीतरी वेगळे अनैतिक संबंध असल्याचे कळते आणि पुढे लग्न होतं नाहीत.झाले तर काही कालावधीनंतर विभक्त होण्याची वेळ येते.म्हणजे कुठे कुणाचे काय चाललंय हे ना मुलींच्या ना मुलांच्या आईवडिलांना कळत नाही. त्यामुळे ऐनवेळी नको ते घडते आणि मग मनस्ताप सहन करावा लागतो.
सध्याच्या काळामध्ये विवाह प्रथा विस्कळीत झाली याचं उदाहरण द्यायचं झालं तर लग्न जमवून देणारे काही मध्यस्थी कुठून तरी मुलगी शोधुन आणतात.मग तो मध्यस्थी दोघी पक्षाकडून पैसे उकळतो आणि त्या दोघांचं लग्न लाऊन देतो.शेवटी काय होत ती नवरी मुलगी काही दिवस सासरी रहाते आणि दागदागिने,पैसे घेऊन पळून जाते त्यानंतर तो दलाल ही सापडत नाही आणि ती मुलगीही सापडत नाही.म्हणजे कुठे चालली आपली संस्कृती.लग्न प्रथेचा नुसताच बाजार मांडलाय शिवाय जागोजागी वधु वर सुचक केंद्र सुरू झालीत,या आणि आपल्या आवडीच स्थळ निवडा असे जागोजागी फलक बघायला मिळतात.याचा अर्थ असा की मुलाला बायको आणि मुलीला नवरा मिळण्यासाठी अशा वधुवर सुचक केंद्राच आधार घेण्याची वेळ आलीय. अशा वधु वर सूचक केंद्रा मार्फत जमलेली लग्नं टिकेलचं यांची काही शास्वती नसते.पुर्वीच्या काळी आजच्यासारखी आमंत्रण देण्याची, मुलीला बघायला जाण्याची,पत्रीका पाहून लग्नं करण्याची पध्दत नव्हती. लग्नाच मुहूर्त काढूनही लग्नं वेळेवर लागत नाही.पुर्वी शब्दाला महत्व होते वडील जेष्ठ मंडळी जे सांगायचे ते प्रमाण समजून मुलाला,मुलीला जे आहे त्यांच्या सोबत लग्नं करावं लागतं होते.ना पत्रका ना पसंती,सदन कुटुंब आणि होतकरू मुलागा शिवाय संस्कारी मुलगी असली की लग्न व्हायचं पण हल्ली तसं होत नाही. सर्वकाही मनासारखं उच्चभ्रू असायला हवं समाजात मान प्रतिष्ठाही असायला हवी.नेटनेटकं बारीकसारीक गोष्टी पाहूनच लग्न जमवली जातात.आता जे सदन श्रीमंत आहे ते या सर्वगोष्टी पाहुनच मुला मुलीचं लग्न करतात. ज्याची सर्वसाधारण परिस्थिती आहे ते तर आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न करून घेतात त्यांना कसली प्रतिष्ठा.पण आजकाल तर सर्वकस एकदमच थाटात झालं पाहिजे.कुठे काही कमी पडायला नको लग्न होण्यापासून तर जेवापर्यंन्त एकदमच थाटमाट व्हायला हवं असाच आग्रहच असतो.आता ज्यांच्या जवळ पैसा असेल तो करतो. पण अशा थाटमाटचा परिणाम सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या कुटंबाला व्हायला लागला आहे. चांगला मुलगा चागंल कुटुंब हातून जायला नको म्हणून तो गरीब बिचारा बाप आपल्या मुलीसाठी उधार उसनवारी करून कर्ज काढून वर पित्याने सांगितल्याप्रमाणे त्याला लग्न करुन द्यावे लागते.त्यात प्री वेडिंगच भुतं तर मानगुटीवरुन उतरायला तयार नाही. खरतरं प्री वेडिंग हा वाह्यात प्रकार आणि वायफळ खर्च आहे. कशाला हवं प्री वेडिंग.प्री वेडिंगने काय साध्य करायचं असतं काही कळत नाही.लग्नाधी प्री वेडिंग करायच नंतर लग्नात मोठ्या स्क्रीनवर दाखवायचं बघा लग्नाधी आम्ही काय करून आलो.प्री वेडिंग म्हणजे नुस्ता देखावा असतो. पुर्वी वधु वराला एव्हढ मुक्त स्वातंत्र्य नव्हतं.आता तर पहिल्या भेटीतच तासंतास बोलायला मोबाईल भेट दिला जातो.नंतर मग प्री वेडिंग होतं नंतर लग्न होतं त्यानंतर मग दोघांमध्ये वाद होतात आणि काही महिन्यांतच घटस्फोट होतात.म्हणजे हे सर्व उपद्व्याप करून काय साध्य होतं.निभावल तर खूपचं चांगलं,नाही निभावलं तर कोर्टाच्या खेट्रा मारा असणं ना? असंच एक माझ्या ओळखीच्या परिवारातील मुलाचं श्रीमंत कुटुंबातातील मुलीसोबत लग्नं जमले.सर्वकाही मनासारखे झाले मुलगा मुलगी उच्चविद्याविभूषित दोघांनाही भरगच्च पगार.मुलगा विदेशात नोकरीला,दोघांचे लग्न जमले थाटात साखरपुडा झाला.दिड लाख रुपये खर्च करून प्री वेडिंग केले. त्यानंतर तिन महिन्यावर लग्न आले असताना मुलीने लग्नानंतर विदेशात यायला चक्क नकार दिला आणि ते लग्न मोडले आता काय कामाचं ते प्री वेडिंग,गेलेत ना दिड लाख रूपये वाया.म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणून त्यांची अशी उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे?.तेच पैसे योग्य काही उपयोगात आणले असते तर त्याचा फायदा त्यांनाच झाला असता ना!.पण आपली शानोशौकत दाखवायला जणू स्पर्धाच लागली आहे.लग्नातही प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो.लग्न म्हणजे स्वत:ची श्रीमंती दाखवायची असाच त्याचा अर्थ होतो.पण कशाला!करोना एव्हढी समज देऊन गेल्यावरही लोकं काही एकत नाही.करोना काळात अगदी कमी खर्चात ना प्री वेडिंग ना थाटमाट ना कसलाच देखावा अगदी साध्या पध्दतीने सर्वसामान्य कुटुंबातील माणसांनीच नाही तर श्रीमंतानी सुध्दा त्यावेळी मुलामुलींचे साध्या पध्दतीने लग्न लावलेत.पण आता प्री वेडिंग आणि मोठ्या थाटामाटात लग्न करतात याच आश्चर्यच वाटतं. जेवनातही प्रचंड खर्च केला जातो. शिवाय वैदीक पध्दतीने लग्न करण्याचाही जास्त आग्रह असतो म्हणून सकाळी वैदीक लग्नं लावतात त्यानंतर मंगलाष्टके म्हणून लग्न लावतात.लग्न कुठल्याही पध्दतीने लावा हो,पण त्या दोघांचा संसार सुखाने चालला पाहिजे.उगाच शिक्षणाचा,पैशाचा गर्व करून एकमेकांच्या लायकी वर येऊन जर काही दिवसांतच त्या दोघांना विभक्त व्हावे लागत असेल तर कशाला करावा एव्हढा खर्च. लग्नं म्हणजे पोरखेळ नव्हे दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न असतो.
मुलगा असो अथवा मुलगी एकदा आयुष्य उध्वस्त झालं म्हणजे सहजासहजी ते स्थिरस्थावर होत नाही. शिवाय दोघांच्याही आईवडिलांना मनस्ताप सहन करावा लागतो.पुन्हा दुसरे लग्नं करायचं म्हटलं म्हणजे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागतं म्हणून समयसूचकता समजून घेऊन जर लग्न केले तर तोंड लपवण्याची वेळ येत नाही किंबहुना पाठीमागून कोणी वाईट बोलत नाही.लोकांच काय,लग्नाला येतात खाऊन पिऊन जातात.आणि भलतंच काही घडलं तरं तिच माणसं बोलायला पुढे असतात.खरतर कोणाचं का असेना मुला मुलीने आपल्या बुध्दीचा सौंदर्याचा आणि पगाराचा गर्व न करता दोघांनी समझदारी आणि समजूतदारपणाने घेतले तर नात्यात कायम गोडवा रहातो.आपल वागणं चांगलं असलं तर नात्यात कटूता येत नाही.दोघांमधल अंतर वाढत नाही. ऐकमेकांना समजून घेणं हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.भलेही लग्नात मुलगा पैसे खर्च करत असले.तो मुलगा किंवा ती मुलगी त्यांच्या मना प्रमाणे लग्न करून घेत असतीलं पण ज्या कष्टाने आपला बाप समाजात प्रतिष्ठा प्रस्थापित करतो.ती प्रतिष्ठा त्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेली असते. बाप त्यांच्या चांगल्या वागण्याने समाजामध्ये स्वतःचं एक आगळावेगळा मान सन्मान मिळवत असतो.आणि लग्ना नंतर जर नव्याने लग्न झालेल्या नवराबायको मध्ये वाद विवाद होत असतील आणि बापाची प्रतिष्ठा, मान सन्मान धुळीला मिळत असेल तर लग्नं न केललच बरं. तेव्हां लग्ना नंतर चे काही धोके लक्षात घेऊन.जर खर्च केला तर उरलेला तोच पैसा भविष्यात आपल्या कामी येईल. सध्या महागाईचे चटके कोणालाही सहण होत नाही.म्हणजे आपल्या लग्नाची अविस्मरणीय आठवण म्हणून लग्नासाठी करत असलेल्या खर्चातून काही पैसे वृद्धाश्रमात वृद्धांसाठी खर्च केला तर त्यांच्या सारखा आनंद नाही.एखाद्या गरीबांच्या मुलीच्या लग्नासाठी त्या पैशाचा उपयोग करा.सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांना जर तुमच्या पैशांची त्यांना मदत झाली तर त्यांच्या ईतके पुण्य नाही.सणवारी त्यांच्या मुलगा देशाच्या सिमेवर तैनात असतो आणि इकडे त्याच्या घरी चुल पेटत नसते. अशावेळी आपल्या मदतीची त्यांना नितांत गरज असते.त्या वेळी आपण त्याचे पाठराखी होवून जर मदत केली तर त्याच्यां चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला खूप आशिर्वाद देऊन जातो.पण सहजासहजी असं होतं नाही.असो समाजाच्या हिताचे काम जर आपल्याकडून होत नसेल तर प्री वेडिंग सारख्या फालतु गोष्टींवर होणारा खर्च वाचवून त्या पैसांनी एफ डी करून बॅंकेत ठेवले म्हणजे संसाराच्या वाटेवर आयुष्य जगताना कुठलीच अडचण येणार नाही.तेव्हा जरा सबुरीने घेऊन विवाह बोहल्यावर चढण्याधी आपल्या खर्चावर आवर घाला.लग्नं करण्यासाठी प्री वेडिंग गरजेचे नाही.आणि प्री वेडिंग करायलाच पाहिजे असंही नाही. लग्नात अतिशयोक्ती व भडकपणा नको कारण विवाह हा घरगुती कौटुंबिक सोहळा आहे.आणि असा आनंदाचा क्षण प्रेमाने साजरा करायचा असतो.मग या आनंदाच्या सोहळ्यात प्री वेडिंग सारख्यी चुकीची प्रथा कशाला हवी.एकतर अवाजवी खर्च करून लग्नात मोठ्या स्क्रीनवर प्री वेडिंग दाखवून सामाजिक मर्यादेच भंग करतो.विवाह हा प्रत्येकासाठी आनंदाचा सोहळा असतो.या आनंदाच्या क्षणी सार्वजनिक प्रदर्शन कशाला करायचं. हल्ली तर आनंदापेक्षा देखाव्याला जास्त महत्त्व दिले जाते. लग्नात केलेला वारेमाप खर्च पाहून आलेल्या पाहुण्यांनी कौतुक केलं पाहिजे यासाठी वधु वरांच्या आईवडिलांचा अट्टाहास असतो.आता ज्यांच्याकडे पैसा आहे तो लग्न सोहळ्यात त्याला हवी तशी हौसमौज करु शकतो पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्याने उगाच कर्ज काढून कशाला अवाजवी मोठेपणा दाखवावा.आपण आपल हातचं राखून खर्च केला तरी लग्न थाटामाटात होत.आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी कर्जबाजारी होऊन असे काहीबाही इव्हेंट कशाला करावेत.आपली सामाजिक मर्यादा आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही असा सोहळा केला तर तो अनेकांच्या स्मरणात कायम लक्षात रहातो.प्री वेडिंग सारखी चुकीची प्रथा कायमची बंद झाली पाहिजे.कस आहे की लग्न कसंही करा पण ते लग्नासारखे असायला हवं अगदी सुरेख सुंदर साधंसुधं महागडे आणि मर्यादा भंग करणारे प्री वेडिंग करून आपलंच हसु होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे काय…
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*
*संवाद मिडिया*
*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*
*ADVT LINK👇*
————————————————
🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*
👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*
👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*
👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*
👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*
👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*
👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*
👉 आजच खरेदी करा…📝
🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*
📱9289922336, 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*