प्रशासन व तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांच्या सुरू असलेल्या उपोषणांना उ.बा.ठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट..
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रशासन व तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी तालुक्यात कोनाळ तिलारी पाटबंधारे कार्यालय समोर तिलारी प्रकल्पग्रस्त शंकर केसरकर व इतर दहा प्रकल्पग्रस्त प्रलंबित वन टाईम सेटलमेंट साठी उपोषण ला बसले, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, कार्यकारी अभियंता यांच्या शी याबाबत लवकर योग्य तोडगा काढून, हा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी केली उ.बा.ठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिंरगे येथील ग्रामस्थांनी सरकारी जमिनीत ऐका खाजगी व्यक्ती ने अतिक्रमणा विरोधात उपोषण केले होते.येथील सरकारी जमीनीत असलेल्या पाणी टाकी जवळ अतिक्रमण केल्यामुळे ,, अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.. हे उपोषण मिटवण्यासाठी.तहसीलदार संकेत यमकर व कार्यकारी अभियंता जाधव यांनी हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे लेखी पत्र दिले.. सदर उपोषण ग्रामस्थांनी मागे घेतले.. तसेच तहसीलदार कार्यालय समोर आयनोडे येथील सतिश सावंत व कुटुंबबिय गेले तेवीस वर्षे पर्यायी शेतजमीन साठी सतत उपोषण बसत होते.. या उपोषण चा तहसीलदार संकेत यमकर यांनी तोडगा काढत उपोषण मागे घेण्याची लेखी पत्र देऊन विनंती केली.. उपोषण मागे घेतले.. या तिन्ही उपोषणाच्या ठिकाणी तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना ता. प्रमुख मदन राणे.. महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी.. सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे , युवा सेना शुभम धर्णे,व विकी धर्णे आदी पदाधिकारी यांनी उपोषणकत्यांशी चर्चा करून पाठिंबा जाहीर केला.. उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा केली.