शिरोडा वेळागरातील ताज प्रकल्प क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी
शेतकरी महिलांचे मुलांसह खाडीपात्रातील पाण्यात तर पुरुषांचे ओरोस येथे आंदोलन
वेंगुर्ले
शिरोडा वेळागर येथील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांवर १९९० सालापासून झालेल्या अन्यायाविरुद्ध व ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा वेळागर शेतकरी संघटनेच्यावतीने भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आज २६ जानेवारी रोजी शिरोडा वेळागर येथील खाजण खाडीपात्रातील पाण्यात महिलांनी आपल्या कुटुब समवेत उभे राहून आंदोलन छेडले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३५ ते ४० कुटुंबातील पुरुष सदस्यांनी आंदोलन छेडले असून एकाच वेळी दोन ठिकाणी आगळे वेगळे लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडले आहे.
गेली तीस वर्ष वेळागरवासिय आपल्या न्याय हक्कासाठी लढा लढत आहेत. त्यांची घरे व शेती बाग बागायती यातूनच ३० ते ३५ कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आज त्यांच्या सातबारा यामध्ये एमटीडीसी अशी शासनाची नोंद झाली आहे. ती नोंद रद्द करून पूर्ववत शेतकरी बागायतदार भूमिपुत्रांच्या नावाची नोंद करून द्यावी व शेतकऱ्यांना भूमीहिन होण्यापासून वाचवावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुलांनीही सहभाग दर्शविला. यावेळी उर्मिला आदुलेकर, राजश्री आंदूलेकर, भाग्यश्री गवंडी, महिमा नाईक, कुमुदिनी गवंडी, शितल आरोसकर, वनिता आरोसकर, शारदा आरोसकर, संध्या रेडकर, रूपाली आरोसकर, प्रगती आरोसकर, दीपा आमरे, रश्मी डिचोलकर, शर्वाणी नाईक यासह अन्य महिला त्याचबरोबर विनोद आरोसकर वामन गवंडी संजय आंदूलेकर, महेश आदुलेकर, प्रदीप आरोसकर जगन्नाथ आदुर्लेकर यासह वेळागर वाडी येथील ३५ ते ४० कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
WhatsAppFacebookTwitterTelegramShare



WhatsAppFacebook
Previous article
महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे,आघाडी तुटली हे जाहीर करण्याचे बाकी आहे
Next article
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, जाऊ व नणंदेला १० वर्षे सक्त मजुरी
RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग
लोकसभेच्या महाविजयासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले आई भराडीला साकडे!

कणकवली
महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे,आघाडी तुटली हे जाहीर करण्याचे बाकी आहे
FOLLOW US ON INSTAGRAM
@PRAHAAR_DIGITAL_KONKAN
EDITOR PICKS

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा…
January 26, 2024

लोकसभेच्या महाविजयासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले आई भराडीला साकडे!
January 26, 2024

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणार!
January 26, 2024
POPULAR POSTS

Team India: ६ पैकी ६ सामने जिंकले तरी सेमीफायनलमध्ये नाही पोहोचली…
November 1, 2023

MATHERAN: माथेरानमधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट
May 30, 2023

सिंधुदुर्गला भूकंपाचा धक्का
July 29, 2023
POPULAR CATEGORY
रत्नागिरी5821
सिंधुदुर्ग5622
ताज्या घडामोडी5106
सावंतवाडी1557
महत्वाच्या बातम्या1213
कणकवली1011
चिपळूण787
खेड674
मालवण654

ABOUT US
Newspaper is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: konkanprahaar@gmail.com
FOLLOW US
© Design By – 9421719953