You are currently viewing प्रभाग क्रमांक चार मधील प्रलंबित कामास प्रारंभ झाल्याने माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांचे 26 रोजी चे उपोषण मागे

प्रभाग क्रमांक चार मधील प्रलंबित कामास प्रारंभ झाल्याने माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांचे 26 रोजी चे उपोषण मागे

प्रभाग क्रमांक चार मधील प्रलंबित कामास प्रारंभ झाल्याने माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांचे 26 रोजी चे उपोषण मागे

सावंतवाडी

प्रभाग क्र. ४ मधील रस्त्यांच्या कामांना ठेकेदारांनी सुरुवात न केल्यास राजू बेग यांनी 26 जानेवरी रोजी उपोषणाचा इशारा सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना 12 जानेवारीला निवेदनाद्वारे दिला होता. राजू बेग यांनी दिलेल्या उपोषणाची सावंतवाडी मुख्याधिकाऱ्याने गंभीर दखल घेत प्रभाग चार मधील दोन कामांचे माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांच्याच हस्ते उद्घाटन करून ती कामे पूर्ण केली. तसेच उर्वरित दोन प्रलंबित कामे येत्या चार दिवसात करू अशा आशयाचे पत्र मुख्याधिकारी यांनी राजू बेग यांना दिले आहे. त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी 26 जानेवारीला उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा