*केंद्रीय मंत्री नारायणजी राणे यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी श्री परितोष कंकाळ यांचा सन्मान
वेंगुर्ले
वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत स्वच्छतेमध्ये विविध पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेले असून यावर्षीही त्यात सातत्य राखत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्या निमित्ताने केंद्रीय सुष्म,लघू,मध्यम उद्योग मंत्री मा.श्री. नारायणजी राणे साहेब यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री परितोष कंकाळ यांचा सातेरी देवस्थान वेंगुर्ला येथे सन्मान करण्यात आला.
♦️यावेळी माजी आमदार मा.श्री राजन तेली साहेब , सिंधुदुर्ग भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप ,प्रदेश का. का.सदस्य शरदजी चव्हाण , तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, श्री प्रशांत आपटे, सौ. शीतल आंगचेकर, सौ. श्रेया मयेकर, सौ. कृपा गिरप , बाबली वायंगणकर , वसंत तांडेल , जयंत मोंडकर , विष्णु उर्फ पपु परब , दाजी परब , रविंद्र परब , सुनिल परब , प्रसाद परब , सत्यवान परब, सारीका काळसेकर , सुजाता देसाई , प्रार्थना हळदणकर , ज्ञानेश्वर केळजी , राजबा सावंत तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सातेरी देवस्थान कमिटीचे विश्वस्थ व ग्रामस्थ उपस्थित होते .