कारवाईसाठी पालिका प्रशासनाची धाव ; शहरात जागोजागी असलेली दुकाने हटवण्याची मागणी
सावंतवाडी
येथील संत गाडगेबाबा भाजी मंडई परिसरात बसणा-या स्थानिक व्यापा-यांनी आज पुन्हा आपली दुकाने बाहेर लावली.शहरात जागोजागी दुकाने असल्यामुळे आमचा धंदा होत नाही.त्यामुळे एक तर ती दुकाने बंद करा,अन्यथा आम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या काळात बाहेर बसण्याची परवानगी द्या,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले. उशिरापर्यंत त्यांना आत बसा,अशी सूचना पालिका प्रशासनाकडून सुरू होती.परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे आता नगराध्यक्ष संजू परब नेमकी कोणती भूमिका घेतात.याकडे लक्ष लागून राहिले आहे.