*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ३५*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आपण आज *शङ्खस्मृतितील* काही वर्णन पाहू या . द्वितीय अध्यायात ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र या चार वर्णांची संस्कारप्रणाली वर्णित आहे . त्यात नामकरण संस्कारात पुढील श्लोक येतो .
*शर्मान्तं ब्राह्मणस्योक्तं वर्मान्तं क्षत्रियस्य तु ।*
*धनान्तं चैव वैश्यस्य दासान्त वान्त्यजन्मनः ॥*
ब्राह्मणाचे नावाचा शेवट शर्मन् , क्षत्रियाचे नावाचा शेवट वर्मन् , वैश्याचे नावाचा शेवट धन व शूद्राचे नावाचा शेवट दास असला पाहिजे .
पुढे तीनही वर्णांचे ब्रह्मचारींसाठी मृगाजीन , व्याघ्रचर्म व अजाचर्माचा उल्लेख येतो . ब्राह्मणाने पळस , क्षत्रियाने पिंपळ व वैश्याने बेलाचा दण्ड वापरावा . यज्ञोपवित कापूस , क्षौम व लोकरीचे क्रमशः वापरावे . भिक्षा मागतांना तीनही वर्णांनी क्रमशः आदि , मध्य व अन्ती ‘भवत् ‘ शब्दाचा वापर करावा . म्हणजे —
*ब्राह्मण—ॐ भवति भिक्षां देहि ।
*क्षत्रिय—ॐ भिक्षां भवति देहि ।
*वैश्य—ॐ भिक्षां देहि भवति ।
इथे मूर्ख बुद्धि लोक भेद बघू शकतात !! पण सम्यक् बुद्धि विचारवन्त अजिबात नाही !! कारण आजमितीस आमच्या राष्ट्राची सर्वात उच्च पदाची म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही विद्यमान महामहीम राष्ट्राध्यक्ष ( मला राष्ट्रपति शब्द म्हणायची लाज वाटते , कारण मी ही भूमी जगदीशाची मानतो व याच विचाराचे राजे भारतभूमीत झालेत ! )कोविंद विरुद्ध श्रीमती मीराकुमार अशी नाही लढली गेली !! ते स्वरुप दलित विरुद्ध दलित होते !! इतका खालचा दर्जा तर गाठलाय सर्व क्षेत्रातल्या तथाकथित विचारवंतांनी !! ज्या देशातल्या ऋषिंनी विश्वधर्म , विश्वकल्याण , विश्वबंधुत्व , विश्वारोग्य , विश्वराट् , इ. शब्दश्रृंखला जगाला दिली , त्या देशातले ऋषि भेद शिकवतील , असे वाटते ? भेद लोकशाहीतील राजकारण्यांकडून शिकवला जातो म्हणून आम्ही रामराज्याची संकल्पना वा मागणी मनोमन करतो .
एकदा सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ दादाजींची चिन्तनिका वा प्रवचन ऐकायला बसलो असतांना त्यांनी एक उदाहरण दिलेले अजून स्मरणात आहे . ते असे . आई मुलांना जेवायला बोलावते . एकाला दोन पोळ्या , एकाला चार पोळ्या व एकाला आठ पोळ्या खावू घालते . मग ती भेदभाव करते का ? नाही . कारण ती चार , आठ व पंधरा अशा वयाच्या मुलांना खावू घालते !! प्रत्येकाची पाचनशक्ति जशी असते तसे आई अन्न खावू घालेल ना ! तेच तत्व इथेही काम करते ! कधी मी विनोदाने म्हणतो की ब्राह्मण भित्रा म्हणून मृगचर्म , क्षत्रिय बलवान म्हणून व्याघ्रचर्म व वैश्यास कितीही धन अपुरेच पडते , तो धन गोळा करणे बंदच करत नाही ! म्हणून त्यास अजाचर्म वापरण्यास सांगितले असावे ऋषिंनी !!😂😂
*पण हा प्रकार किंवा याचे उत्तर मला आजच्या सरकारी आधारकार्डने दिले !!! मला हा भेद वाटत नसून त्यावेळेचे वर्ण ओळखता यावा समोर येणार्याचा म्हणून वर्णव्यवस्थेची ऋषिंनी केलेली ही आधारकार्डची सोय वाटते !!!!*
पुन्हा प्रश्न उभा राहतोच ! ऋषि वाईट असतील ? सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी ! नुसते विसरु नकाच पण आपणही ऋषि होण्याचा प्रयत्न करा .🙏🙏
विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? उद्या काही श्लोक पाहू .🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*अभिनव उद्योग प्रबोधिनी आयोजित डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण*
*सविस्तर वाचा👇*
————————————————
जग झपाट्याने बदलत चाललंय…🌐
टेक्नॉलॉजीमध्ये पण निरंतर प्रगती होत आहे..🤗
*काळाप्रमाणे आपणही बदलणार की नाही ?*🤔
*बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या व्यवसायाला अधिक सक्षम करा.*😇
👉 *खाद्य पदार्थ क्षेत्र* म्हणजे *फूड इंडस्ट्री* मध्ये डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
👉डिहायड्रेशन पद्धतीचा अवलंब करुन आपण *रेडी टू कूक, रेडी टू इट तसेच पावडर, फ्लेक्स* या प्रकारात शेकडो प्रॉडक्ट्स बनवू शकतो.
👉 फळं, भाज्या, हंगामी पिके, मासे इत्यादी वस्तू अनेक कारणांमुळे बऱ्याच अंशी खराब होतात, वाया जातात, त्याचा पूर्ण वापर होत नाही.
👉 *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी* वापरुन या सर्व वस्तूंचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, वर्षभर त्याचा लाभ घेता येईल.
👉 सध्या सर्वत्र डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स ना खूप मागणी आहे आणि या डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सची रेंज, आवाका पण खूप मोठा आहे.
👉 *सखोल प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे डिहायड्रेशन व्यवसायात चांगली कामगिरी करु शकतो, भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.*
👉 *अभिनव उद्योग प्रबोधिनी* ने 19-20-21 जानेवारी रोजी *कुडाळ* येथे 3 दिवसीय *डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण* आयोजित केलं आहे.
👉 हे प्रशिक्षण पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित असून व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
👉 हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया *DHY* असा व्हॉट्स ॲप मेसेज *8767473919* या क्रमांकावर पाठवावा.
👉 हा मेसेज आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करा, सहकार्य करा.
🛑 *टीम अभिनव*
8767473919
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*