You are currently viewing नेमळे-देऊळवाडीतील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर कोसळली

नेमळे-देऊळवाडीतील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर कोसळली

नेमळे-देऊळवाडीतील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर कोसळली…

सावंतवाडी

नेमळे-देऊळवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर कोसळून जमीनदोस्त झाली आहे. ही घटना काल सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान ही विहीर कोसळल्यामुळे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १५ कुटुंबांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.
नेमळे देऊळवाडी येथील अती जीर्ण झालेली सार्वजनिक विहीर म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीच्या आतील चिऱ्याचे दगड सडून गेल्याने विहीर धोकादायक झाली होती. मात्र काल सकाळी विहिरीचा कठडा आणि विहीर दिसत नसल्याने विहीर गायब कुठे झाली याची एकच खळबळ उडाली. यासाठी येथील ग्रामस्थांनी याची कल्पना नेमळे ग्रामपंचायतीला दिली. ही बातमी समजताच नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान, तलाठी पाटोळे यांनी कोसळलेल्या विहिरीची पाहणी करून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा