आम.नितेश राणे यांनी कणकवलीत उभारली १५ फूट उंचीची प्रभू श्री रामाची भव्य मूर्ती
*अपूर्व उत्साहात आणि रामनामाच्या जयघोषात मूर्तीचे झाले अनावरण
*छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारली आहे मूर्ती
* धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा असलेली कणकवली झाली भक्तीमय
*२२ रोजी महाआरती ,धार्मिक कार्यक्रम आणि कार सेवकांचा होणार सत्कार*
कणकवली
अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून त्या ठिकाणी २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामाच्या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा क्षण देशातील प्रत्येक हिंदू आणि समस्त नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. यानिमित्ताने आमदार नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंधरा फूट उंचीची धनुर्धारी प्रभू श्री रामाची भव्य मूर्ती कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारली आहे.या मूर्तीचे अनावरण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे ,नगराध्यक्ष समीर नलावडे,विधानसभा मतदार संघ प्रमुख मनोज रावराणे, बँक संचालक विठ्ठल देसाई ,समीर सावंत, बंडू हरणे, जील्हा महीला उपाध्यक्ष राजश्री धुमाळे , शहर अध्यक्ष अण्णा कोदे,मेघा गांगण,समीर प्रभू गावकर,पप्पू पुजारे,संदीप सावंत,महेश तळगावकर,सर्वेश दळवी,शिशिर परुळेकर,संजय कामतेकर,अभी मुसळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ चे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर,उपाध्यक्ष कल्याण पारकर,खजिनदार आनंद पारकर, चेतन मुंज,श्री.डीचोलकर,मनोज हिर्लेकर आदी सह भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवलीतील मध्यावर्ती बसविलेली ही प्रभू श्रीरामाची मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.भगव्या रंगात असलेली ही मूर्ती बलशाली,धनुर्धारी श्रीरामाची प्रतिकृती आहे. २२ जानेवारी हा देशभरात उत्सवाचा, आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने कणकवलीत श्रीराम प्रभूंची पूर्णाकृती थर्माकोल ची मूर्ती उत्सवासाठी उभारण्यात आलेली आहे. या मूर्तीवर करण्यात आलेली प्रकाश योजना डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. धार्मिक आणि सात्विक अशा श्री प्रभू रामाच्या कणकवलीतील आगमनाने आध्यात्मिक वारसा असलेली परमपूज्य भालचंद्र बाबांची कणकवली नगरी भक्तीमय झाली आहे.
दरम्यान २२ जानेवारी रोजी सायंकाळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती,कार सेवकांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर चेंदवणकर दशावतारी नाटक मंडळाचे नाटक होणार आहे.