एसटीच्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग सेंटरसाठी लवकरच वर्क ऑर्डर
एसटीच्या १९६ बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार लवकरच दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार चार्जिंग सेंटर
कणकवली :
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १९६ बसेस राज्य परिवहन महामंडळाच्या येणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ले या ठिकाणी चार्जिंग सेंटर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
या चार्जिंग सेंटरच्या उभारण्याच्या कामाची रवर्क ऑर्डरर लवकरच देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ५१५० इलेक्ट्रिक बस राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. या इलेक्ट्रक बस राज्यातील १०१ एसटी आगारांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून १७२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी सिंधुदुर्गात 5 चार्जिंग सेंटर होत आहेत. त्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ले या आगारांमध्ये एसटीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. वरीष्ठ कार्यालयातून उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या चार्जिंग सेंटरच्या कामासाठी कार्यारंभ आदेश देवून प्रत्येकक्षात कामाला सुरुवात करण्यात असल्याचे वृत्त आहे. त्या चार्जिंग सेंटरसाठी विद्युत पुरवठा वीज महामंडळाकडून घेण्यात आहे. त्याबाबत वीज मंडळाला पत्रव्यवहार करुन अंदाजित खर्चाचे कोटेशन मागविण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील एसटीचे चार्जिंग सेंटर सुरू झाल्यानंतर ताबडतोब सिंधुदुर्गात इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. काही महिन्यांमध्ये या बसेस नव्या स्वरुपातील प्रवाशांना या बसेस बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
*जिल्ह्यात एसटीच्या ताफ्यात १९६ इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल*
या चार्जिंग सेंटरवर एक इलेक्ट्रिक बस पूर्ण चार्ज होण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. एकदा पूर्ण चार्ज केलेली बस ३५० किलोमीटर बस रस्त्यावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बसेस असल्यामुळे शुन्य प्रदुषण व आवाज नसल्याने पर्यावरण पुरक असणार आहेत. सिंधुदुर्गात १९६ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळणार आहे. या बसेस ४४ आसनी असणार आहेत.
संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*