दोडामार्ग :
तळकट (ता. दोडामार्ग) येथील सुमित प्रभाकर सडेकर सी.ए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. बेताची परिस्थिती असताना त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. तळकट येथील प्रभाकर सडेकर यांचा सुमित मुलगा. सुमित याचे वडील मजुरीचे काम करतात तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असताना सुमित याने आपले ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घेतली. कोलझर समाज सेवा हायस्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर त्याने मुंबई गाठली तेथे बीकॉम पर्यंतचे शिक्षण घेतलेे. त्यानंतर कठीण मानल्या जाणाऱ्या सीएच्या परीक्षेत उतरण्याचा त्यांने निर्णय घेतला. त्याने त्यासाठी अथक परिश्रम घेतले. गेली तीन वर्ष तो या परीक्षेसाठी मेहनत घेत होता अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. अलीकडे जाहीर झालेल्या सीएच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला परिस्थितीवर मात करत त्याने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि कुटुंबीयांना त्याने दिले आहे. दरम्यान मुंबई मंडळातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला मंडळाचे, पदाधिकारी जयसिंग सावंत, दीपक मळीक, सदानंद राणे, सुधन सावंत, गणपत देसाई, विनायक सडेकर, शरद धुरी आदी उपस्थित होते.