*बांदा ग्रामस्थांच्या लढयाला यश, मोबाईल टॉवरला नविन बॅटरी बसवल्या*
*26 जानेवारीचे “भीक मांगो” आंदोलन घेतले मागे*
प्रतिनिधी (बांदा):-
भारत दूरसंचार निगमच्या बांदा येथील मोबाईल टॉवरला वीज गेल्यावर बॅटरी बॅकअप नसल्याने लगेचच टॉवर बंद होत होता. त्यामुळे बांदा ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग तसेच व्यापारी व खरेदी करता आलेल्या पंचक्रोशीतील लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. सध्याच्या काळात सर्व गोष्टी या ऑनलाइन पद्धतीने होत असताना रेंजच नसल्याने विद्यार्थी वर्गांचे ऑनलाईन अभ्यास,बँक व्यवहार, वर्क फ्रॉम होम करणारा नोकरवर्ग तसेच यूपीआय द्वारे पेमेंट अशा सर्व प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांच्या वेळी अडचणी येत होत्या. त्यामुळे याबाबत बांदा ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी होती बांदा हे बुडीत क्षेत्रात येत असल्याने दरवर्षी पुराची समस्या उद्भवत असते.अशा आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी संपर्क साधण्याचे मोबाईल हे एकमेव साधन असते. त्यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांना प्रचंड गैरसोईला सामोरे जावे लागत होते.
याकरिता येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गुरु कल्याणकर,श्री.हेमंत दाभोळकर व श्री.गुरुदास गवंडे यांच्याकडून गेले वर्षभर सतत भारत दूरसंचार निगमकडे पत्रव्यवहार, निवेदने,पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु भारत संचार निगम कडून कोणत्याही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर, दि.०८/०१/२०२४ रोजी बांदा ग्रामस्थांनी दूरसंचार निगमच्या सावंतवाडी कार्यालयाला धडक दिली व २५जानेवारी पर्यंत बांदा येथील टॉवर बॅटरी बॅकअप ने सज्ज न झाल्यास २६जानेवारी रोजी दूरसंचार निगमच्या सावंतवाडी येथील कार्यालयाबाहेर अनोखे “भीक मांगो” आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी दूरसंचार निगमचे उपमहाप्रबंधक श्री.आर.व्ही.जन्नु यांच्याकडून २६जानेवारी पर्यंत बांदा टॉवर बॅटरी बॅकअप ने सुसज्ज करणार असे लेखी आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे आज बांदा येथे सहा नवीन बॅटऱ्या उपलब्ध करून त्यांची जोडणी देखील करण्यात आली.
बांदा ग्रामस्थ व व्यापारी वर्गाकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.त्यामुळे २६जानेवारी रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे श्री गुरु कल्याणकर व श्री हेमंत दाभोलकर यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी ही मागणी मान्य झाली असली तरी रेंज व फ्रिक्वेन्सी याकरिता आम्ही सतत पाठपुरावा करणार असल्याचे व तो प्रश्न देखील येत्या काही दिवसात सोडवणार असल्याचे श्री गुरुदास गवंडे यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी श्री गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,गुरुदास गवंडे व बांदा मराठा समाज सचिव श्री आनंद वसकर तसेच भारत दूरसंचार निगमचे अधिकारी श्री.महेंद्र, पुण्यवंत व संतोष मयेकर उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*