दोडामार्ग
दोडामार्ग शहरात पूर्ण रस्त्यांवर जागोजागी गतीरोधक आहेत पण संबंधित विभागाने त्याच्याकडे दुर्लक्षित घटक असे समजून पूर्णपणे पाठ फिरवली आहे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते परंतु गतिरोधकावर सूचित पांढरे पट्टे नसल्याने अपघात होताना दिसत आहेत.
दोडामार्ग शहर दिवसेंदिवस व्यापाराच्या दृष्टीने बलाढ्य होत चालले आहे पण दोडामार्ग नगरपंचायत शहराकडे कोणत्या दृष्टीने पाहते याचे उत्तर अनुत्तरीतच आहे गतिरोधक हे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी घातले जातात परंतु दोडामार्ग शहरात घालण्यात आलेले गतिरोधक हे अपघाताला आमंत्रण देताना दिसत आहेत. दोडामार्ग शहर हे गोवा राज्याच्या सीमेलगत असून तसेच कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांचा महामार्ग हा दोडामार्ग शहरातून जात असल्याने दोडामार्ग शहरात वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते त्यात वाहनचालक सुसाट वेगाने वाहन घेऊन जाताना दिसत असतात. गतिरोधकावर कोणत्याही प्रकारची सूचना दर्शक खुणा नसल्याने त्या ठिकाणी अपघात होऊ शकतात त्यामुळे तात्काळ दोडामार्ग शहरातील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे