You are currently viewing रामदास माने एक यशस्वी उद्योजक

रामदास माने एक यशस्वी उद्योजक

*रामदास माने एक यशस्वी उद्योजक*

येत्या रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी अमरावतीला राज्यस्तरीय उद्योजक मेळावा होत आहे. खरोखरच ही एक आनंदाची आणि अनुकरणीय बाब आहे. आजच्या काळामध्ये तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे हा कानमंत्र देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे .मी जेव्हा गुजरातमध्ये जातो तेव्हा तिथली उद्योजकांची आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर युवकांनी उद्योजकाकडे वळले पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते .गुजरात मधील उद्योजक फारसे शिकलेले नाहीत .पण त्यांनी उत्कृष्ट उच्च विद्या विभूषित मॅनेजर ठेवून आपले व्यवसाय उंचीवर नेऊन ठेवलेले आहेत. महाराष्ट्र राज्यमध्ये तसा प्रयत्न होत आहे ही खरोखरच अभिनंदनची बाब आहे .माझ्या परिचयाचे एक मराठी उद्योजक आहेत. रामदास माने हे त्यांचे नाव .त्यांना पूर्ण जग टॉयलेट मॅन तसेच थर्माकोल मॅन म्हणून ओळखते .youtube वर गुगलवर त्यांचे सगळे व्हिडिओ आहेत. हा माणूस सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका खेडेगावात राहणारा .माण तालुका हा गोंदवलेकर महाराजांच्या नावाने ओळखला जातो. पण हा भाग दुष्काळी .पाण्याची सोय नाही .पण अशा परिस्थितीमध्ये या मुलाने जी गरुडझेप घेतलेली आहे ती निश्चितच नोंदणीय आहे .हा मुलगा व त्यांचे मित्र व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री प्रभाकरराव देशमुख हे नोकरी शोधण्यासाठी जेव्हा सर्वप्रथम पुण्याला आले तेव्हा खिशात पैसे नसल्यामुळे रेल्वे स्टेशनवर पुलाखाली वर्तमानपत्र टाकून झोपले .पण आज या माणसाने जी प्रगती केलेली आहे ती जगातील उद्योगात नोंदणीय झालेली आहे .आज संपूर्ण जगात त्यांचे थर्माकोलचे प्रसाधन गृह जातात. त्यांनी वेगळ्या प्रकारचे प्रसाधन गृह बनवलेले आहेत .ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येतात .हे प्रसाधनगृह बनवताना त्यांनी सिमेंटच्यामध्ये मधोमध थर्माकोल टाकलेले आहे .त्यामुळे प्रसाधनगृहाचे वजन हे काही प्रमाणात कमी झालेले आहे .त्याचबरोबर दळणवळण करण्यासाठी हे प्रसाधनगृह सोयीचे झालेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगातून या प्रसाधनगृहाना प्रचंड मागणी आहे. मी जेव्हा रामदास मानेंना भेटलो तेव्हा ते मला म्हणाले सर मी जेव्हा पुण्याला आलो ना तेव्हा माझी राहण्या जेवणाची तर सोडा पण माझ्याकडे येण्यासाठी पण पैसे नव्हते .पण मी माझ्या आजीजवळ हट्ट धरला आणि माझ्या आजीने मला एसटीच्या तिकिटापुरते पैसे दिले .मी ज्या कंपनीमध्ये सर्वप्रथम मुलाखत दिली त्या कंपनीने मला आम्ही तुम्हाला नंतर कळवितो असे सांगितले .मी त्यांना स्पष्ट सांगितले साहेब माझ्याजवळ पैसे नाहीत. तुम्ही जेव्हा परत मला कळवाl तेव्हा माझ्याजवळ पैसे नसतील .कृपया तुमचा निकाल असेल तो मला आज कळवला तर बरं होईल .मुलाखत घेणाऱ्यांना दया आली आणि ते म्हणाले तुम्ही सायंकाळपर्यंत थांबा .सगळ्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. सगळ्या मुलाखती आटोपल्या. मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना आतमध्ये बोलावले आणि त्यांना सांगितले तुमची निवड झालेली आहे. उद्या दहा वाजता तुम्ही कंपनीमध्ये रुजू व्हायला या.त्यांनी सांगितले खरे. मला दुसऱ्या दिवशी दहा वाजता कंपनीमध्ये रुजू व्हायचे होते .पण रात्रभर राहायचे कुठे ? हा प्रश्न होता. पण माझ्या मनामध्ये बाबा आमटे यांच्या ओळी होत्या ,- शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही .- मी त्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक परिसरामध्ये फिरलो .तिथे जे चौकीदार होते त्यांना विनंती केली. त्यानी मला राहण्याची परवानगी दिली. आजीने दिलेली शिदोरी होती .त्या शिदोरीवर मी ती रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कंपनीमध्ये नोकरीला गेलो. शंभर रुपये महिना कंपनीमध्ये मिळत होता. एक वर्षभर मानेसाहेब उघड्यावरच त्या चौकीदाराकडे झोपत होते. राहत होते .पुढे महेंद्र अँड महेंद्र फिनोलेक्स बजाज अशा कंपन्यांमध्ये त्यांची नेमणूक होत गेली. पुढे एका कंपनीमध्ये काम करीत असताना त्यांनी थर्मकोल होण्याची मशीन तयार केली .जी मशीन जर्मनीवरून एक कोटी रुपयांमध्ये येत होती .ती त्यांनी फक्त दहा लाखात भारतात तयार केली .त्यांच्या या कामाने भारावून त्यांना मद्रासला सहा लाख रुपये प्रतिमाह असणारी नोकरी मिळाली .आज या सर्व पाठबळावर रामदास माने यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली आहे. आज जवळपास जगातील दीडशे देशांमध्ये त्यांच्या थर्माकोलचा तसेच थर्माकोलच्या प्रसाधनगृहाचा व्यवसाय आहे आणि आजच्या घटकाला त्यांनी जवळपास चौदा हजार लोकांना रोजगार दिलेला आहे. खरोखरच त्यांची ही यशोगाथा नवीन उद्योजकांना प्रेरणादायी आहे. मुलाजवळ जाण्यासाठी पैसे नव्हते .तो आज करोडपती झालेला असला तरी त्यांच्यातली माणुसकी अजूनही टिकून आहे .जेव्हा ते एमआयडीसीमध्ये चौकीदाराच्या आश्रयाला गेले तेव्हा त्यांनी आपल्याकडील दोन भाकरीमधील एक भाकर त्याला देऊ केली. आजही त्यांचा तो स्वभाव कायम आहे. परवा एका विद्यार्थ्याला मी त्याच्याकडे पाठवले .माझ्या मित्राचा तो नातलग होता .साहेब म्हणाले पाठवून द्या .मी त्याला नोकरी देतो .मुलाने 10000 पगार मागितला. साहेबांनी त्याला सांगितले दहा हजारात पुण्यामध्ये काही होणार नाही .मी पंधरा हजार रुपये देतो .फक्त प्रामाणिकपणे निष्ठेने काम करायचे. तो मुलगा माने साहेबांच्या तालमीमध्ये चांगला तयार झाला .आता त्याचा पगार तीन-चार वर्षांमध्ये 25 हजार रुपये झालेला आहे. परवा रामदास माने साहेब आमच्या अमरावतीच्या एका कार्यक्रमाला येऊन गेले .आम्ही अमरावतीच्या सांस्कृतिक भवनमध्ये त्यांचा सत्कार ठेवला .तरुण पिढीला त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवला .आज एवढे मोठे उद्योगपती असूनही माने साहेब जमिनीवर आहेत आणि जमिनीवरच राहतील .हेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचे प्रतीक आहे . प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे माजी सरचिटणीस मराठा सेवा संघ अमरावती.
9890967003

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा