*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मकर संक्रमण*
तिळाला पाहिले गुळासंगे
निखाऱ्यावर झुलतांना
एकरूप होऊन दोघांना
गोड हलव्यात फुलतांना
काटेरी हलवा मधूर गोडवा
प्रेमाचा ओलावा भेटी घडवा
नात्यांची संगत असावी सोबत
मैत्रीचा ठेवा विश्वास जपावा
सुर्य भ्रमण मकर संक्रमण
ऋतु बदल होता उत्तरायण
वर्षारंभीचा पहिलाच सण
मकर संक्रांतीचे महत्त्व जाण
मनोकामना पूर्ण व्हाव्यात
संकल्पना नव्या मनिच्छा
नवे वर्ष सुख समृद्धिचे जावो
मकर संक्रांत दिनी हिच सदिच्छा
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.