You are currently viewing बॅ. नाथ पै सेवांगणच्या अध्यक्षपदी ऍड. देवदत्त परुळेकर यांची निवड…

बॅ. नाथ पै सेवांगणच्या अध्यक्षपदी ऍड. देवदत्त परुळेकर यांची निवड…

बॅ. नाथ पै सेवांगणच्या अध्यक्षपदी ऍड. देवदत्त परुळेकर यांची निवड…

कार्याध्यक्षपदी पद्मनाभ शिरोडकर व कार्यवाहपदी लक्ष्मीकांत खोबरेकर..

मालवण

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेच्या निवडणूकीनंतर झालेली विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध झाली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी अॅङ देवदत्त परुळेकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी पद्मनाभ उर्फ किशोर शिरोडकर आणि कार्यवाहपदी लक्ष्मीकांत खोबरेकर यांची निवड करण्यात आली.

बॅ. नाथ पै सेवांगणाची पंचवार्षिक निवडणूक बाबुकाका अवसरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. आणि यात अँङ देवदत्त परूळेकर यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले होते. यामुळे आज निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत वालकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळ अशा दोन मंडळांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नुतन संचालक मंडळ उपस्थित होते.

निवडण्यात आलेल्या कार्यकारी मंडळात कार्याध्यक्ष – पद्मनाभ शिरोडकर, कार्योपाध्यक्ष संदीप निंबाळकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, सहकार्यवाह प्रमोद देसाई, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सभासद जगदीश नलावडे, विणा म्हाडगुत, सुभाष नेरूरकर, शरद मोरजकर, विश्वस्त मंडळ अध्यक्ष – अॅड. देवदत्त परूळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, सभासद अरविंद परूळेकर, दिपक भोगटे, राजेंद्र खांडाळेकर, विकास म्हाडगुत, पद्मनाभ शिरोडकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर म्हणाले, बॅ. नाथ पै यांचे विचार पुढे नेण्याचे शिवधनुष्य आमच्या खांद्यावर टाकण्यात आलेले आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि सभासदांनी तो चांगल्याप्रकारे स्विकारला आहे. आम्ही करत असलेले कार्य पुढे नेण्यासाठी सर्व सभासदांचे सहकार्यही आवश्यक आहे, आणि तशाप्रकारे सर्वांचे सहकार्य यापुढेही आम्ही अपेक्षित समजतो. आम्ही बॅ नाथ पै यांचे विचार पुढे नेत असताना युवा पिढीला दिशा देण्याचेही काम केले आहे, आणि पुढे करतच राहणार आहोत. सामाजिक उपक्रम आणि प्रबोधन यातूनच आम्ही पुढे जात राहणार आहोत, असेही ते म्हणाले.

सेवांगणाचे पुरस्कार जाहीर

बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी समारोप सोहळा २१ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता बॅ. नाथ पै सेवांगण याठिकाणी होणार आहे. यावेळी कोकण रेल्वेचे शिल्पकार संसदपटू प्रा. मधु दंडवते हे पुस्तक लेखक माधव कदम यांनी लिहीले असून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच डॉ. प्रमोद वालावलकर यांना आदर्शन वैद्यकीय व्यक्तीमत्व पुरस्कार, श्रीमती सुषमा केणी यांना प्रा. मधु दंडवते विज्ञाननिष्ठ पुरस्कार, टी. एस. पेडणेकर यांना गुरुवर्य दादासाहेब शिखरे पुरस्कार या तिन्ही पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे. तसेच सखाराम विनायक कुलळकर्णी देऊलकर स्मृती दोन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परूळेकर, समाजवादी कार्यकर्ते घनःशाम वालावलकर, सुरेश प्रभावळकर, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, बॅ. नाथ पै सेवांगण अध्यक्ष अॅड देवदत्त परुळेकर हे उपस्थित राहणार आहे. यावेळी बॅ. नाथ पै प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर व कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा