समीर वंजारी यांचा आरोप
२४ तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी सावंतवाडी वासियांना किमान मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केली आहे. दरम्यान सावंतवाडी शहरात व्यवसाय करणाऱ्या टेम्पो चालक मालकांनी घेतलेल्या भूमिकेला काँग्रेस म्हणून आमचा पाठिंबा आहे. त्यांना पालिका प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सावंतवाडी पालिकेत सद्यस्थितीत पाण्यावरून राजकारण सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी वेळ बदलण्याचे नाटक करण्यापेक्षा शहरातील लोकांना कशा पद्धतीने मुबलक पाणी मिळेल, याचे योग्य ते नियोजन पालिका प्रशासनाने करावे. मी स्वतः येथील उभाबाजार परिसरातील नागरिक आहे. परिसरात शंभर फुटावर एकही विहीर नसल्यामुळे अनेक वेळा पाण्याच्या समस्येला परिसरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घ्या, अशी त्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आम्ही बाहेरून आलेल्या व्यवसायिकांना विरोध करीत नाही. परंतु स्थानिक जगले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथील ठेकेदार, उद्योगपती यांनी स्थानिकांच्याच गाड्या भाड्यासाठी वापराव्यात, अशी त्यांनी मागणी केली आहे.
सावंतवाडी शहरात पाणी योजनांचा सुकाळ परंतु पाण्याचा दुष्काळ