पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा विशेष सत्कार…
मसुरे :
श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, विक्रम या हस्तलिखिताचे प्रकाशन व मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी जि.प.माजी अध्यक्ष श्री.संग्राम प्रभुगांवकर,सिंधुदुर्ग जिल्हाशिक्षण समिती माजी सदस्या तथा जि.प.माजी अध्यक्षा सौ.सरोजताई परब, मर्डे सरपंच श्री.संदीप हडकर, उपसरपंच श्री.राजेश गांवकर,निवृत्त नौसैनिक श्री. धनंजय सावंत, शा.व्य.स.माजी अध्यक्ष तथा पत्रकार श्री.दत्तप्रसाद पेडणेकर, शा.व्य.समिती अध्यक्ष सौ.शितल शैलेश मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे शा.व्य.समिती शिक्षणप्रेमी सदस्य श्री.सन्मेश मसुरेकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, ग्राम.पं.समिती सदस्य सौ.भक्ती भोगले, राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शिवराज सावंत, श्री.विनोद सातार्डेकर, श्री.गोपाळ गावडे, सौ.रामेश्वरी मगर, श्री.नितीन पाटिल, मसुरे पोलीस श्री फरांदे, हेमलता दुखंडे, शिफा शेख, ज्योती पेडणेकर, सीताराम परब, समीक्षा गोलतकर, श्री नंददीपक साटम, श्री आहिर, अनिरुद्ध बागवे, आम्रपाली मोरे, संतोष मसुरकर, तसेच शिक्षक, शाळा समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी श्री.संग्रामजी प्रभुगांवकर, सौ.सरोजताई परब, श्री.संदिप हडकर, श्री.धनंजय सावंत, श्री.नारायण देशमुख, श्री.शिवराज सावंत यांनी शाळा व विद्यार्थी प्रगती याबद्दल गौरवोद्गार काढले. विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी प्रशालेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शाळेची माजी विद्यार्थीनी श्रीम.सीमा नारायण साटम यांच्या एक लाख रु.ठेव रकमेतील व्याजातून, माजी विद्यार्थी केंद्रशाळा मसुरे नं.१ ची दशावतार टिमने ७१५००/- (एकाहत्तर हजार पाचशे) रु.कायमस्वरुपी ठेव व्याजातून तसेच श्री.तारक कांबळी यांनी ठेवलेल्या १५०००/- रु.ठेव, श्रीम.कल्याणी कांबळी मँडम यांची ५०००/-रु.ठेव, श्री.गुरुनाथ ताम्हणकर सर यांची ५०००/-रु.ठेव तसेच मसुरे ग्रामस्थ ११०००/-रु. ठेवा रकमेवरील व्याजातून गुणी, होतकरु व कलाकार विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तु देऊन गौरवण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी कु.चैतन्य भोगले व आदर्श विद्यार्थीनी व इस्रो सहलीसाठी निवड झालेली कु.श्रेया मगर या विद्यार्थ्यांना विशेष गौरवण्यात आले. यावेळी पाककला स्पर्धे मधिल विजेते सौ.ज्योती पेडणेकर, सौ.हेमलता दुखंडे व सौ.आसावरी ठाकुर यांना गौरवण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विक्रम या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल,श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.
तसेच जिल्हा आदर्श गुणवंत पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल या प्रशालेचे माजी विद्यार्थी तसेच प्रशालेचे माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान मुख्या.सौ.शर्वरी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. संध्याकाळच्या सतरा मध्ये मसुरे केंद्र शाळेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, विनोदी एकांकिका, विविध वाद्य वादन, एकेरी नृत्य, समूह नृत्य आदी कार्यक्रम रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडले. विविध गुणदर्शन पर कार्यक्रम होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कोरिओग्राफर्स यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत यांनी केले, सूत्रसंचलन श्री.विनोद सातार्डेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गोपाळ गावडे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांनी, शालेय शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांनी मेहनत घेतली.