ऑलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्णपदक
सावंतवाडी
इंग्रजी ऑलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. यात वीरा मनोज सावंत ( इयत्ता १ ली), हितेश गुरुप्रसाद नार्वेकर ( इयत्ता १ ली), आरव अजित सावंत ( इयत्ता १ ली ), युगा जोगेश परब (इयत्ता २री ), ॲल्रिक जॉन डिसोजा( इयत्ता २ री), लीना शाबाज शेख ( इयत्ता २ री ), गार्गी दत्तगुरु भोगण ( इयत्ता ४ थी ), आगा मोहम्मद सुभान इलायज (इयत्ता ४ थी), शेन रॉबर्ट अल्मेडा (इयत्ता ४ थी), आदिल शेख ( इयत्ता ५ वी), साची शिवनाथ टोपले (इयत्ता ६ वी), नंदिनी राऊळ (इयत्ता ७ वी ), निलराज सावंत (इयत्ता ७ वी ), सानिका घाडी(इयत्ता ७ वी), निधी निलेश कानविंदे ( इयत्ता ८ वी), अवनी मेघ:शाम भांगले ( इयत्ता ८ वी), सिद्धेश सुहास गावडे ( इयत्ता ८ वी), मानस महेश राऊळ( इयत्ता १० वी), आर्यन अंकुश शेटवे( इयत्ता १० वी) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी सुवर्णपदक देऊन गौरव केला. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो , पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.