करुळ घाट २२ जानेवारी ते ३१ मार्च पर्यंत राहणार बंद…!
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून घाट’बंदचे आदेश जारी…!
फोंडा घाट, भुईबावडा घाट व अनुस्कारा घाटातून वाहतूक सुरू…!
कणकवली
पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा महत्त्वाचा करुळ घाटातील रस्ता मजबुतीकरण व दुप्पदरीकरणाच्या कामासाठी सोमवार दिनांक २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान सुमारे अडीज महिने घाटातील वाहातुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून घाटबंदचे आदेश जारी करण्यात आला आहे. तर करुळ घाटातील वाहातुक फोंडा घाट, भुईबावडा घाट व अनुस्कारा घाटातून वळविण्यात आली आहे.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच रस्ता काॕक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान करुळ घाटातुन ऐकेरी वाहातुक चालु ठेवणे शक्य नसुन अपघात होण्याची शक्यता आहे. घाटमार्गात रस्ता जेमतेम ७ कि.मी.रुंदीचा आहे. तसेच रस्ता तीव्र चढ उतार, वेडीवाकडी धोकादायक वळणे असून घाटातून अवजड वाहने, ट्रेलर यांची सतत वर्दळ असते. घाटमार्ग दुपदरीकरणाचे काम राञंदिवस विना अडथळा होणे करीता १५ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान सर्वप्रकारची वाहातूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन सोमवार दिनांक २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान घाटमार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या घाटातील वाहातूक ही मुख्यतः फोंडा घाटातून प्रवाशी व अवजड तर भुईबावडा घाटातुन फक्त प्रवाशी वाहातूक तसेच अनुस्कुरा घाटातून प्रवाशी व अवजड वाहातूक सुरु ठेवण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी काढले आहेत.
वाहातूक बंद केलेल्या रस्ता व पर्यायी वाहातूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशा दर्शक फलक, वाहातूक संकेत चिन्हे, लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याचे किंवा उभारण्याची कार्यावाही करण्यात यावी.असेही आदेशात नमूद केले आहे.
त्यामुळे पुढचे सुमारे अडीज महीने करुळ घाटातील वाहातूक पूर्णपणे बंद राहाणार आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहनचालाकांची गैरसोय होणार आहे. तर याचा वैभववाडी बाजारपेठेवरही परिणाम होणार