You are currently viewing शारदा विद्या मंदिरात भाजपा आध्यात्मिक आघाडीचा कार्यक्रम श्री रामाच्या गजरात साजरा..

शारदा विद्या मंदिरात भाजपा आध्यात्मिक आघाडीचा कार्यक्रम श्री रामाच्या गजरात साजरा..

ठाणे :

 

ठाण्यातील शारदा विद्या मंदिर या शाळेत भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा बाल संस्कार राम कथेचा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापिका सौ एम व्ही जाधव यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर (जिल्हा) संयोजक सौ अश्विनी पटवर्धन यांनी, राम मंदिराविषयी मुलांना काही प्रश्न विचारून त्यांना राम जन्मभूमी मंदिराची माहिती दिली. आणि जय श्रीराम नामाच्या घोषात कार्यक्रमाची सुरुवात करून दिली. सौ सोनाली मॅडम, यांनी मुलांकडून मारुती स्तोत्र पठण करून घेतले. सहसंयोजक सौ अलकनंदा जोशी यांनी राम रक्षा पठण मुलांकडून करून घेतले. हे सर्व झाल्यावर सौ देविका मॅडमनी राम भक्त शबरीची कथा मुलांना सांगून त्या कथेतून जीवन विषयक बोध दिला. यावेळी अलकनंदा जोशी यांनी हनुमानाबद्दल मुलांना सुंदर गोष्ट सांगितली. रामामुळे हनुमानाला विद्या प्राप्त झाली. म्हणून मुलांनी भगवान श्रीरामाचे नाम घ्यावे. आणि जीवनात त्यांच्यासारखे आचरण करावे.

सौ योगिता कात्रे ताईंनी जय श्रीराम ही कविता मुलांकडून गाऊन घेतली. पत्रकार रुपेश पवार यांचे प्रभू श्रीराम हे रेकॉर्डिंग गीत सादर करण्यात आले. हे गाणे दिवेश पाटील यांनी गायले आहे. शारदा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभू श्री रामाचा जय घोष केला.

याप्रसंगी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर जिल्हा संयोजक अश्विनीताई पटवर्धन पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की आम्ही १३ डिसेंबर पासून विविध शाळांमध्ये हा उपक्रम घ्यायचे ठरवले आणि आत्तापर्यंत ह्या उपक्रमामध्ये विविध शाळांच्या माध्यमातून ४००० विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही आमची ही बालसंस्कार रामकथा पोहोचवली आहे. या सर्व मुलांकडून राम नाम आणि रामरक्षा म्हणून घेण्याचा हा यज्ञ आम्ही सुरू केला आहे आणि आमचा २२ जानेवारी पर्यंत ५००० मुलांचा टप्पा पार होणार आहे, यासाठी जननायक प्रभू श्रीरामाचे आभार आणि माननीय पतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचेही आभार कारण त्यांनी २०२४ ह्या नवीन वर्षाची अतिशय सुंदर अशी भेट दिली. म्हणजे आपले आयोध्येतील श्रीराम मंदिर ही जगातल्या सर्वच लोकांना दिली गेलेली सुंदर वस्तू आहे, यासाठी त्यांचे खास आभार !

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोन शारदा विद्या मंदिर शालेय समिती निमंत्रक पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एम व्ही जाधव सर्व सहकारी शिक्षक तसेच भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अलकनंदा जोशी,देविका वळंजू, योगीता कात्रे, सोनाली मेहेंदळे, विवेक बर्वे,रुपेश पवार हे उपस्थित होते.

यावेळी ह्या शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना तसेच शाळेतील शिक्षकांना आयोध्येतून आलेल्या अक्षतांचे वाटपही करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम राम नामाच्या गजरात उत्साहात पार पडला.

 

पत्रकार रुपेश पवार

९९३०८५२१६५

प्रतिक्रिया व्यक्त करा