You are currently viewing “फक्त मी”

“फक्त मी”

“फक्त मी”

जेव्हा कधी तू
प्रेमाची भुकेली होशील
तुझी भूक भागविण्यास
तुझ्या सोबत असेन फक्त मी…

जेव्हा कधी तू
मायेला पोरकी होशील
तुला अमाप माया करण्यास
तुझ्या डोक्यावर हात ठेवीन फक्त मी…

जेव्हा कधी तू
एकांतात रडत बसशील
तेव्हा तुझे अश्रू झेलण्यास
ओंजळ पुढे करेन फक्त मी…

जेव्हा कधी तू
दुःखी कष्टी असशील
तेव्हा तुझं दुःख वाटून घेण्यास
त्यात वाटेकरी असेन फक्त मी…

जेव्हा कधी तू
चालताना अडखळशील
तुला सहारा देण्यास
हात पुढे करेन फक्त मी…

जेव्हा कधी तू
यशाकडे झेपावशील
तुला यशस्वी पाहण्यास
आतुर असेन फक्त मी…

पण….

जेव्हा कधी तू
मागे वळून पाहशील
तुला डोळे भरून पाहण्यास
तेव्हा मात्र नसेन तो सुद्धा फक्त मी…

दिपी…
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा