You are currently viewing स्मृति भाग २८

स्मृति भाग २८

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना.*

 

*स्मृति भाग २८*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या स्मृतितील चवथ्या अध्यायात पुढील श्लोक येतात . तत्पूर्वी —

मी काही वर्षापूर्वी परभणीजवळील एका खेडेगावात एका युवकाचे लग्नात त्याचा माझ्याघरावरील अतिशय निरलस वा निरागस स्नेह व जिव्हाळा असल्यामुळे गेलो होतो . अंदाजे वर्‍हाड दोनहीकडून चार साडेचार हजार असावे . जेवतांना प्रथम पंक्तीतच बसलो . पंक्तीत अदमासे पाचशे ते सातशे जण बसले असावे . ( बुफेसिस्टीम नाही ! ) पण सर्व पदार्थ वाढले गेल्यानंतर माईकवरुन श्लोक म्हटले गेले आणि त्यानंतरच प्रत्येकाने ताटातील पदार्थाला हात लावला , तोवर नाही ! माझे जेवण झाल्यावर मी बाजूला थांबून सारी गंमत पहात होतो . पाच ते सहा पंक्ती उठल्या , पण एकानेही श्लोक झाल्याशिवाय ताटातील पदार्थास हात लावला नाही !! मी समजलो , माझं काही सुकृत असेल की मी असे दृश्य पहात होतो . समाधान पावलो . आणि लाज वाटली आम्ही ब्राह्मण्य मिरवतो याची ! मिरवावं ज्याला मिरवायची हौस असेल त्याने !! पण जेवणाआगोदर जो भूक शमवितो त्याची आठवण न काढणारा माणूस असतो ? असो . आता पुढील अध्यायातील श्लोक पाहू .

 

*गृहाश्रमात्परो धर्मो नास्ति नास्ति पुनः पुनः ।*

*सर्वतीर्थफलं तस्य यथोक्तं यस्तु पालयेत् ॥*

ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो , की गृहस्थाश्रम धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणताच धर्म नाही . जो मनुष्य या आश्रमाचे यथोक्त योग्य रितीने पालन करतो , तो सर्व तीर्थांचे फल प्राप्त करतो .

जे धर्माला रिलीजन म्हणतात , त्यांना गृहस्थधर्मास काही शब्द सुचवता येतील का इंग्रजीत ? मला आवडेल ! पण महर्षिंनी गृहस्थाश्रमावर ठासून सांगितले आहे , म्हणून कुणीही सन्यासी होण्याचा विचार करु नये ?!!!!😂😂 कारण वंशासह धर्म ही वृद्धिंगत व्हावा असे वाटते . पुढे ते म्हणतात ,

 

*गुरुभक्तो भृत्यपोषी दयावाननसूयकः ।*

*नित्यजापी च होमी च सत्यवादी जितेन्द्रियः ॥*

*स्वदारे यस्य सन्तोषः परदारनिवर्तनम् ।*

*अपवादोSपि नो यस्य तस्य तीर्थफलं गृहे ॥*

मोठ्यांवर श्रद्धा ठेवणारा , आश्रित जनांचे भरणपोषण करणारा , दयावान , असूया न करणारा , नित्य जप करणारा , होम करणारा , सत्यवादी , जितेन्द्रिय , जो आपल्याच पत्नीमधे संतुष्ट आहे आणि परस्त्रीपासून दूर आहे , ज्याची कुठल्याही प्रकारची बदनामी नाही , अशा गृहस्थास घरातच सर्व तीर्थांचे फळ मिळते .

यासारखे सुंदर आणि समजूतदारपणाचे विवेचन कुठे असू शकेल !?!?!? इथे ” गुरुभक्ति ” हा शब्द आलेला आहे . जे गुरुइझममधे अडकलेले आहेत , त्यांना हा श्लोक म्हणजे गुरुच्या प्रचाराची पर्वणीच !! जसा शिष्य योग्य गुरुच्या शोधात असतो , तसा खरा गुरु योग्य शिष्याच्याच शोधात असतो , हे मला सांगावे लागू नये !! *” जो लघु नसतो तो गुरु ” ही व्याख्या मला सर्व स्वाध्यायींचे हृदयस्थ प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादाजी यांचे मुखारविंदातून ऐकावयास मिळाली , तेंव्हाच मी तृप्तीचा अनुभव घेतला . भारतात तसा गुरुइझम बोकाळला आहे , त्याने बरेच नुकसान केले आहे संस्कृतीचे !! तशा अध्यात्मक्षेत्रातील बर्‍याच पदव्यासुद्धा विकत मिळतात आज !!!!! गल्लोगल्ली महंत , मोठेबाबा , गुरु , आचार्य पहावयास मिळतात !! *”गुरु “* ही गोष्टच वेगळी ! गुरु , ऋषि , संत , आचार्य , ब्राह्मण ही वेगवेगळी शिखरं आहेत ज्ञान—कर्म—भक्ति—उपासना—व्रतवैकल्य यांच्या विचार—उच्चार—आचारांची ! हे कधी कळेल माझ्या भारतीय बांधवांना !?!?! ते पुन्हा स्वर्णयुग असेल माझ्या भारत मातेसाठी !!!!

पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

प्रतिक्रिया व्यक्त करा