You are currently viewing इचलकरंजी प्रेस क्लबचा प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान

इचलकरंजी प्रेस क्लबचा प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान

इचलकरंजी प्रेस क्लबचा प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात कन्या महाविद्यालयाच्या प्रा.डाॅ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण
प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा, प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, उपाध्यक्ष अरुण काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील कन्या महाविद्यालयाच्या प्रा.डाॅ. प्रतिभा पैलवान यांनी राजहंस सोशल फौंडेशनच्या माध्यमातून
तृतीय पंथीयांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.तसेच वंचित ,अनाथ ,गरीब मुलांचे प्रबोधन करत त्यांना सुसंस्कारित व शिक्षणातून स्वावलंबी करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.विशेष म्हणजे साहित्य क्षेत्रातही मानवी नातेसंबंध व
विविध ज्वलंत प्रश्नांना स्पर्श करत
कविता लेखनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांनी तर प्रास्ताविक संजय खूळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख दयानंद लिपारे यांनी करून दिली.आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी मानले. सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केले. लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर ,पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा