You are currently viewing प्लोगेथाॅनमधून ‘एमआयटी एडीटी’चा राष्ट्रीय युवा दिन

प्लोगेथाॅनमधून ‘एमआयटी एडीटी’चा राष्ट्रीय युवा दिन

*प्लोगेथाॅनमधून ‘एमआयटी एडीटी’चा राष्ट्रीय युवा दिन*
रामदरा मंदिर परिसरातून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छता व आरोग्याचा संदेश

पुणेः

एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचे विद्यार्थी कल्याण मंडळ, स्वीडिश इन्स्टिट्यूट व अॅल्युमनी नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने तिर्थक्षेत्र रामदरा मंदिर परिसरात प्लोगेथाॅनचे आयोजन करून स्वच्छता व आरोग्याचा संदेश देताना राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. धनकचऱ्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व व्यायामाच्या अभावामुळे मनुष्याचा आयुष्यात वाढलेले आजार यांच्याप्रती समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्लोगेथाॅनमध्ये विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रामदरा मंदिरात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देवाचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उक्रमात केवळ मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली नाही तर विद्यार्थ्यांनी फलकांद्वारे लोकांची जनजागृती करताना त्यांचे प्रबोधन देखील केले.   यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयर, बांबू इंडिया मिशनचे उद्योजक योगेश शिंदे, तेनझिंग नाॅरगे अँडव्हेंचर पुरस्कार विजेती रितू केडिया, स्वीडन अॅल्युमनीचे प्रा.तेजस कराड, डो सेव्ह फाऊंडेशनच्या निर्मला थोरमोटे, अनिकेत थोरमोटे आणि ग्रीन फाऊंडेशनचे अमित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगेश शिंदे यांनी प्लॅस्टिकच्या वस्तूंऐवजी बांबूच्या वस्तूंचा वापर वाढवणे किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच त्यांनी यावेळी एमआयटी एडीटी व प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्लोगेथाॅन सारख्या उपक्रमांचे कौतुक देखील केले.
तसेच रितू केडिया यांनी यावेळी यश मिळवण्यासाठी उत्कटता, संयम आणि चिकाटीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी आपले साहसी अनुभव विशद केले.

*११० किलोंहून अधिक कचरा जमा*
या प्लोगेथाॅनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ११० किलोपेक्षा जास्त कचरा जमा झाला करताना त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली. डॉ. राजेश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदरा मंदिर अधिकारी, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा