You are currently viewing सावंतवाडीतील तरुणाला शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत…

सावंतवाडीतील तरुणाला शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत…

सावंतवाडीतील तरुणाला शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत…

मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार, जाधव कुटुंबीयांकडून मंत्री केसरकर यांचे आभार..

सावंतवाडी

सावंतवाडी येथील तरुण रुग्णाला हृदय शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली.

सावंतवाडीतील गिरीष विठोबा जाधव यांची आर्थिक स्थिती बेताचीच असून ते खाजगी दुकानात नोकरी करतात. ते आपल्या कामाच्या ठिकाणी असताना त्यांना हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला. शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांनी तातडीची वैयक्तिक मदत दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री निधीतून मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले व त्याचेवर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून गिरीष जाधव यांच्यासाठी एक लाखाचा धनादेश बेळगावच्या अरिहंत हास्पीटलचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर एम.डी. दिक्षीत यांच्याकडे पाठविण्यात आला असून गिरिश जाधव यांच्यावर योग्य ते उपचार करुन पुढील कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री निधीतुन मिळालेल्या एक लाखाच्या मदतीमुळे गिरीश जाधव यांच्यावर पुढील उपचार तातडीने करणे सोपे झाले. दिपकभाई केसरकर आणि दिपकभाईंच्या कार्यालयातील अधिकारी, स्वीय सहाय्यक यांचे जाधव कुटुंबियांनी आभार मानले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा