You are currently viewing शिरोडा पशुदवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करा – धाकोरा ग्रामस्थांची मागणी

शिरोडा पशुदवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करा – धाकोरा ग्रामस्थांची मागणी

शिरोडा पशुदवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करा – धाकोरा ग्रामस्थांची मागणी

आठवड्यातून एक दिवस डॉक्टर देण्याचे अधिकाऱ्यांकडून मान्य..

बांदा

शिरोडा पशुदवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी मोठी गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करुन द्या, अशी मागणी धाकोरा ग्रामस्थांनी वेंगुर्ला पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ. चव्हाण यांच्याकडे केली आहे.

धाकोरा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख प्रविण पालव तसेच महादेव कापडी, दत्तात्रय गावडे, सागर गावडे, प्रकाश परब, विष्णु परब, बबली कापडी, अर्जुन पालव, बाबणोब परब, सुंदर गावडे, यशवंत गावडे आदी ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.
दरम्यान, पशुपालक व ग्रामस्थांच्या चर्चेअंती डॉ. चव्हाण म्हणाले की आठवड्यातून एक दिवस बुधवारी शिरोडा दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा