जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याकडून नियुक्ती पत्र मिळाल्याची माहिती
मालवण :
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्याकडे मालवण शहराची अतिरिक्त जबाबदारी, कार्यभार जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिला आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्या आदेशानुसार मालवण शहराची तात्पुरत्या स्वरूपाची जबाबदारी आपल्यावर देण्यात येत आहे. कार्यक्षेत्रात काम करतेवेळी आपण विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख, बुथप्रमुख व शिवदूत इ. सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करावयाच्या आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे, असे विश्वास गावकर यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.