*विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्ही क्षेत्राकडे वळावे*
डाॅ.उल्हास माळवदे यांचे आवाहन; अहमदनगर येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा
अहमदनगरः
सध्याच्या युगात स्पर्धात्मकता वाढली असून विद्यार्थी आता आरामदायक नोकऱ्यांच्या शोधात भटकताना दिसत आहेत. त्यामुळेच प्रचंड संधी उपलब्ध असताना देखील मर्चेंट नेव्हीसारख्या चांगल्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचे दुर्लेक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आव्हानात्मक परंतू तितकाच मानसन्मान मिळवून देणाऱ्या मर्चेंट नेव्ही इंजिनिअरिंगकडे वळले पाहिजे, असे मत एमआयटी एडीटी मॅनेटचे डाॅ.उल्हास माळवदे यांनी मांडले.
ते एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे व सेवा इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १२वी सायन्सच्या विद्यार्थी व पालकांसाठी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा रेसीडेन्सियल महाविद्यालयासमोरील पोलीस बँक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात बारावी नंतरच्या उपलब्ध संधी, प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून सखोल मार्गदर्शन केले गेले. यावेळी, प्रा. सुनील चवळे, प्रा. अमित उत्तरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माळवदे पुढे म्हणाले की, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील गुंतागुंत नीट समजून घेऊन प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे. आवश्यक असणारी कागदपत्रे आत्तापासूनच तयार ठेवावी. प्रवेश प्रक्रियेचा चक्रव्यूह अचूक भेदण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. तसेच स्पर्धा खूप आहे त्यामुळे वेळेचे नियोजन करून उत्तम मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रा. अमित उत्तरकर यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विविध करिअर कोर्सेसची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना सांगितली. ते म्हणाले एमआयटी नेहमीच विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर निवडीसाठी आणि भविष्यासाठी निश्चितपणे होतो. एमआयटी एडीटी विद्यापीठा मार्फत राबवला जाणारा अभ्यासक्रम औद्योगिक गरजा नुसार अद्ययावत केलेला आहे.
प्रा. सुनील चवळे यांनी मर्चंट नेव्ही या वेगळ्या करिअर संधींची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. मॅनेट पुणे यांच्यामार्फत उपलब्ध असणाऱ्या मरीन इंजिनीअरिंग आणि नॉटीकल सायन्स या कोर्स बद्दल उपयुक्त माहितीही त्यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक व आकर्षक अशा मरीन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाची निवड करावी. मॅनेट पुणे ही भारतातील एक नामांकित अशी मरीन इंजिनीअरिंग अभ्यासक्रम शिकवणारी संस्था असून जगभरातील विविध शिपिंग कंपन्यांमध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला अहमदनगर शहरातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी तर आभार सेवा इव्हेंटचे अक्षयकुमार भंडारी यांनी आभार मानले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*