ओटवणे येथे फरसाण भट्टीला लागलेल्या आगीत सुमारे दोन लाखाचे नुकसान
सावंतवाडी पालिकेच्या बंबाने आग विझविण्यास यश
सावंतवाडी
ओटवणे कापईवाडी येेथे फरसाण भट्टी असलेल्या घराला आग लागून सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडला. महेश बांदेकर असे संबंधितांचे नाव आहे. ऐन जत्रोत्सवाच्या हंगामात हा प्रकार घडल्यामुळे श्री. बांदेकर यांचे मोठे नुकसान होणार आहे. याबाबतची माहिती मिळाल्यांनतर पालिकेच्या बंबाने त्या ठिकाणी तात्काळ धाव घेवून आग विझविली. यासाठी पालिकेच्या बंबाचे कर्मचारी नंदू गावकर, अमोल शितोळे, सहदेव कदम, पांडुरंग कोळपकर यांनी त्यासाठी सहकार्य केले.हा प्रकार शॉर्टसर्किटने घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. श्री. बांदेकर हे त्या ठिकाणी खाज्यासह फरसाण व अन्य साहित्य तयार करतात. आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या फॅक्टरीला आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यामुळे पालिकेच्या बंबाला पाचारण करण्यात आले. परंतु तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी तिथे जमलेल्या ग्रामस्थांनी विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी आलेल्या बंबाने आग विझवण्यास यश आले.