You are currently viewing आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह : ॲड. संजू शिरोडकर

आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह : ॲड. संजू शिरोडकर

आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह : ॲड. संजू शिरोडकर

सावंतवाडी

आपली वोटबँक सांभाळण्यासाठी व ठराविक मतदारांना खुश करण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे केवळ अतिशय संतापजनक आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाने जो आहार घेतला तो फळे आणि कंदमुळे. याचे अनेक दाखले भावार्थ रामायणात आहेत. असे असताना आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह असून आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे सावंतवाडी माजी शहर अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी केली आहे.

”राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलत असताना उपस्थित केला होता.त्यांच्या या वक्तव्याचा ॲड. संजू शिरोडकर यांनी जाहिर निषेध केला आहे. आव्हाडांनी कोणतेही वक्तव्य करताना आधी अभ्यास करावा.

भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय १६ वा यात श्रीराम वनवासाला गेल्यानंतर मागे त्यांचे वडील दशरथाचा मृत्यू झाला. तेव्हा वडिलांच्या मृत्यूची वार्ता आपल्या बंधूंना सांगण्याकरिता भरत रामाचा वनवासात ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी गेले . तेव्हा ज्येष्ठ पुत्र या नात्याने रामाच्या हातून वडिलांचे पिंडदान करणे गरजेचे होते. त्या पिंडदानाकरिता तीळ, तांदूळ इत्यादी सामग्री भरताने आयोध्येतून नेली होती; मात्र त्या सामग्रीने श्रीरामाने पिंड दिला नाही . कारण आपण जे अन्न खातो त्याच सामग्रीचा पिंड पितरांकरता द्यावा हा नियम श्रीरामाने तिथे सांगितला. वनवासात मी अन्न सेवन करत नसून फळे आणि कंदमुळेच खातोय , तेव्हा त्याप्रसंगी तीळ तांदूळ यांना बाजूला सारून आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ फळ आणि कंदमुळे यांचाच पिंड श्रीरामाने दिल्याचा उल्लेख भावार्थ रामायणात सापडतो, असा संदर्भही ॲड. शिरोडकर यांनी दिला आहे.

त्यामुळेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या बाबतीत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध असून त्यांनी अशी वक्तव्य करण्याआधी हिंदू धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. केवळ विशिष्ट समाजाच्या मतांचा विचार करून अशी प्रक्षोभक वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा