मंत्री केसरकर यांचे कडून असनिये गावातील रस्त्यासाठी २० लाखाचा निधी…
जिल्हाप्रमुख दळवी यांनी केले उद्घाटन…
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावातील श्रीदेवी माऊली मंदिर ते टेंबवाडी रस्ता मजबुतीकरण करणे या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. या कामाचे उद्घाटन रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी असनिये येथे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, सरपंच सौ. रेश्मा सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती दर्शना दामले, भरत सावंत, शाखाप्रमुख राकेश सावंत, विद्या सावंत, लक्ष्मण सावंत, जितेंद्र सावंत, प्रितेश ठिकार, संदेश कोलते, संभाजी कोलते, बाबल सावंत, रुपेश सावंत, सतीश सावंत, विकास सावंत, वैभव सावंत, कृष्णा सावंत, ओंकार सावंत, रोहित सावंत, सुभाष सावंत, तुकाराम सावंत, प्रशांत ठिकार, नरेंद्र नाईक, बाबुराव सावंत, आनंद ठिकार, प्रेमानंद ठिकार, तुळाजी सावंत, भिकाजी नाईक, सोहम सावंत, शैलेश सावंत, गणपत सावंत, रत्नाकर सावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर काम मंजूर केल्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांचे सर्वांनी आभार मानले.