You are currently viewing पद्मश्री पद्मजा फेणाणी यांना ”एकता कला गौरव पुरस्कार” जाहीर

पद्मश्री पद्मजा फेणाणी यांना ”एकता कला गौरव पुरस्कार” जाहीर

*अभिजित राणे, अशोक लोटणकर, प्रतिभा सराफ, श्रीकांत जाधव, वैशंपायन गमरे यांचाही होणार सन्मान*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

संगीताच्या तानेवर अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या संगीत स्वरसम्राज्ञी पद्मश्री पद्मजा फेणाणी यांना या वर्षीचा ”एकता कला गौरव पुरस्कार” जाहीर झाला असून, संगीत अभिजित राणे, साहित्य अशोक लोटणकर, प्रतिभा सराफ, पत्रकारिता श्रीकांत जाधव, लोकजागर वैशंपायन गमरे, गुन्हा अन्वेषण किरण आव्हाड, सांस्कृतिक कला आयोजक रामचंद्र के. यांचा पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. एकता पुरस्कारांची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केली.

ज्येष्ठ गानसम्राज्ञी पद्मजा फेणाणी यांना या वर्षीचा ”एकता कला गौरव पुरस्कार”, अशोक लोटणकर – साहित्य (कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार), अभिजित राणे – संगीत (उज्जय आंबेकर पुरस्कृत मधू आंबेकर स्मरणार्थ विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार), प्रतिभा सराफ – साहित्य (राजेश जाधव पुरस्कृत काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ दया पवार स्मृती पुरस्कार), दत्तात्रय कराळे – पत्रकारिता (नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार), श्रीकांत जाधव – (रजनी बेनकर पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ जयंत पवार स्मृती पुरस्कार), किरण आव्हाड – गुन्हा अन्वेषण (नंदकुमार गोखले स्मृती पुरस्कार), मधुकर मातोंडकर – सांस्कृतिक चळवळ (महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), वैशंपायन गमरे – लोकजागर (स्मिता जाधव पुरस्कृत रमेश गणपत जाधव स्मरणार्थ सुहास भालेकर स्मृती पुरस्कार), अॅड. आदित्यराज चव्हाण – न्याय (जयप्रकाश नारायण स्मृती पुरस्कार), रामचंद्र के. – कला आयोजक (प्रभात गांगुली स्मृती पुरस्कार), खान रहीम करीम – नृत्य (सुबल सरकार स्मृती पुरस्कार), आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री किरण आरोलकर (सागर कासारे पुरस्कृत वैशाली बाळाराम कासारे स्मरणार्थ बाबा आमटे स्मृती पुरस्कार), पिराजी जाधव (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), संदेश गायकवाड (नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार), संध्या पानसकर (प्रकाश पाटील पुरस्कृत सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), ज्ञानदेव कदम (महर्षी धोंडू केशव कर्वे स्मृती पुरस्कार), अनिल कदम (प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार), सुरेश लोखंडे (गंगाधर म्हात्रे पुरस्कृत यादव जनार्दन म्हात्रे स्मरणार्थ संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), निरंजन जाधव (मिलिंद लोखंडे पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. कवी-पत्रकार भगवान निळे, कवी-साहित्यिक अजय कांडर, हिंदी साहित्यिक रमेश यादव यांच्या निवड समितीने पुरस्कारांची निवड केली आहे. १३ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे, असे एकताचे सचिव कवी प्रकाश पाटील, उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा