सावंतवाडी :
वनक्षेत्रातील अवैध गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी देवसू परिमंडळातील सांगेली, वेर्ले, देवसू, कलंबिस्त, शिरशींगे, केसरी आदी संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती वनपाल बाबासाहेब ढेकळे यांनी दिली.
सदर भागात यापुढे कोणी व्यक्ती संचार करताना किंवा काही अवैध कृत्य करताना आढळून आल्यास वन विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागामार्फत देण्यात आला असल्याचे वनपाल श्री. ढेकळे यांनी सांगितले.