*”लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना विचारवंत गप्प!” – डॉ. बाबा आढाव*
पिंपरी
“देशात आणि राज्यात लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना विचारवंत भीष्माचार्यांसारखे गप्प बसून आहेत!” असे परखड विचार कष्टकरी कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी विज्ञान केंद्र प्रेक्षागृह, ऑटोक्लस्टरसमोर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘अस्वस्थ मनाची वेदना’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सर्व श्रमिक संघटना – पुणे सरचिटणीस मेधा थत्ते, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, विज्ञान केंद्र संचालक प्रवीण तुपे, लेखक अरुण बोऱ्हाडे आणि इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
डॉ. बाबा आढाव पुढे म्हणाले की, “समाजातील सामुदायिक वेदनेचा उच्चार अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. सद्य:स्थितीत जे काही चालले आहे ते आपल्या बुद्धीला पटते आहे का, हा प्रश्न मनाला विचारा. विद्रोह हा माणसाचा स्थायिभाव आहे. त्यातून सांस्कृतिक पातळीवर परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी तळागाळातील माणसांशी सामुदायिकपणे संवाद साधला पाहिजे!” आपल्या मनोगताचा समारोप त्यांनी ‘भारतीय संविधानाचा विजय असो!’ असा त्रिवार जयघोष करीत केला. मानव कांबळे यांनी, “समाजातील समस्या पाहून जो अस्वस्थ होत नाही तो सामाजिक कार्यकर्ता नव्हे; तसेच वास्तवातील प्रश्न ज्याच्या साहित्यात उमटत नाहीत तो साहित्यिकच नव्हे. अरुण बोऱ्हाडे यांच्या लेखनात सामाजिक अस्वस्थता प्रतिबिंबित झाली आहे; परंतु याची दोषनिश्चितीसुद्धा झाली पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. मेधा थत्ते यांनी राजकीय परिस्थितीवर मार्मिक टीकाटिप्पणी करीत, “या देशातील प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य मिळावे, अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली असली तरी ती राज्यकर्त्यांसाठी जाचक आहे!” असे मत मांडले.
लेखक अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून, “समाजातील सर्व क्षेत्रांत असुरक्षित वातावरण आहे. सर्वसामान्य माणसाला मूलभूत सुविधांसाठी पावलागणिक पैसे मोजावे लागतात; परंतु शासनाने आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक म्हणून आपणच कमी पडतो आहोत का?” अशी खंत व्यक्त केली. मोशी येथील पिढीजात शेतकरी दत्तोबा सस्ते यांनी टोपलीतून आणलेल्या शिदोरीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करीत ‘अस्वस्थ मनाची वेदना’ या पुस्तकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तक निर्मितीत सहकार्य करणाऱ्या जयवंत फाळके आणि चार ज्येष्ठ पत्रकारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने गीतांजली बोऱ्हाडे आणि अरुण बोऱ्हाडे या दांपत्याचा हृद्य सन्मान करण्यात आला.
इंद्रायणी साहित्य परिषद आणि गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*