फोंडाघाट गडगेसखल येथे श्री.दत्तजयंती उत्साहात साजरी.
फोंडाघाट
फोंडाघाट गडगेसखल येथे श्री.दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
१७३६ मधील हे प्राचीन मंदिर यात श्री.दत्तजयंती उत्सव साजरा होतो. ६ वाजता उत्सवाच प्रारंभ होतो. श्री दत्त देवाचा पाळणा म्हणुन कार्यक्रम साजरा करण्यात येतो. त्या नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. देऊळ प्राचीन असुन डोंगरावर वसले आहे.हे पांडव कालीन मंदिर म्हणुन नोंद झाली आहे .अजित नाडकर्णी कुटुंबीय सालाबाद प्रमाणे घेतात भेट. आपले वडील स्व.बाबासाहेब नाडकर्णी श्री.दत्त जन्माला राहात होते हजर.तिच प्रथा राखत आपणही कायम येतो.हे आमचे श्रध्दा स्थान आहे.असे ते म्हणाले.मुर्तीही अत्यंत सुबक आहे. नवसाला पावणारे दत्तमंदिर अशी या मंदिराची ख्याती आहे. रात्री १२ वाजता देवळाला ५ वेळा पालखी प्रदक्षीणा घालण्यात येतात. त्यानंतर वाडीतील लोकांनी बसविलेले नाटक १६३६ पाटी सादर करण्यात आले.