*वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीतील कणकेवाडी ते लोपाद्रेश्वर मंदीर रस्त्याचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते भूमिपूजन*
*भाजपाच्या माध्यमातून मठ गावचा विकास — प्रथमेश तेली*
मठ ग्रामपंचायत भाजप च्या ताब्यात आल्यापासून खऱ्या अर्थाने विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर झाली . पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे मा. आम. राजन तेली यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत विविध विकासकामांना निधी आणला , त्यामुळेच भविष्यात भाजपाच्या माध्यमातून मठ गावात विकासगंगा येईल असे प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी भूमिपूजन प्रसंगी केले .
वेंगुर्ला येथील मठ कणकेवाडी ते लोपाद्रेश्वर मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमीपूजन सोहळा भाजप युवामोर्चा प्रदेशउपाध्यक्ष मा.श्री. प्रथमेशजी तेली यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी सरपंच सौ.रुपाली नाईक उपसरपंच महादेव गावडे ,माजी सरपंच धोंडू गावडे , सिद्धी गावडे ,शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर ,युवा नेते अजित नाईक , अक्षय पालव , रोहन गावडे ,अरुण गावडे , सुभाष परब , पांडुरंग निवजेकर ,मंगेश गावडे , दशरथ गावडे , दिगंबर गावडे ,विश्वनाथ निवजेकर व ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .