– सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत
सावंतवाडी
कोकण किनारपट्टीला एक वेगळे महत्त्व आहे .येथील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आता वेगळ्या धर्तीवर मत्स्य पालन व्यवसाय करणे ही सुलभ झाले आहे. हे शोभिवंत मत्स्य पालनच्या माध्यमातून येथील बांधवांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाले आहेत असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी व्यक्त केले कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शरद भवन ट्रस्ट सिंधुदुर्ग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संशोधन संवर्धन प्रकल्प महाविद्यालय मच्छ उद्यान विद्या उद्यानविद्या महाविद्यालय मुंबई अंतर्गत घेण्यात आल्या. एक दिवसीय शोभिवंत मत्स्य पालन विषयक कार्यशाळा प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24 निवडक शेतकरी व महिला उपस्थित होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हा बँकेचे संचालक तथा शरद भवन ट्रस्ट चे विश्वस्त मच्छ उद्योजक विक्टर डॉन्टस, सौ जान्हवी सावंत प्रकल्प प्रमुख व मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर नितीन सावंत व पं.सदस्य विनोद आळवे आदी उपस्थित होते यावेळी श्री सावंत पुढे म्हणाले जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन कृषी पशु संवर्धन यासाठी सहकार्य केले जात आहे खरंतर शोभिवंत मत्स्य पालन साठी आता शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले खरंतर शोभिवंत मत्स्य पालन ही संकल्पना विक्टर डॉन्टस यांनी हाती घेतली आणि ती राबवली ही बाब स्तुत्य आहे माजी कृषिमंत्री तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला हे चांगलेच आहे यावेळी श्री विक्टर डॉन्टस पुढे म्हणाले सिंधुदुर्गातील मत्स्य पालन शेतकरी यांना शोभिवंत मत्स्य पालन चे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचा एक प्रयोग आहे खरंतर येथील मत्स्य शेतकऱ्यांना हे एक नवं दालन उपलब्ध झाला आहे याचा त्यांनी लाभ घ्यावा यावेळी डॉक्टर नितीन सावंत म्हणाले शोभिवंत मत्स्य पालन ही संकल्पना आगळीवेगळी आहे हे सहज सोपी आहे यातून एक आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देणार आहे हे माध्यम आहे घरबसल्या ही तुम्हाला यातून एक नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देणारे माध्यम आहे यावेळी डॉक्टर मनोज घुघूसकर, कृपेश सावंत, जिल्हा बँकेचे अधिकारी किरणकुमार गावडे ,सोमा पालव अंकित फोंडेकर, श्रीमती अंणसूरकर यांनी विशेष मेहनत घेतली.