केसरकर यांच्या निधीतून सावंतवाडी पालिकेला ट्रॅक्टर व कचरा गाडी
सावंतवाडी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून सावंतवाडी पालिकेला ट्रॅक्टर आणि कचरा गाडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यांचा शुभारंभ आज श्री. केसरकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंके, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रतीक बांदेकर, पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.
आता यात दोन गाड्या वाढल्यामुळे कचरा लवकरात लवकर जमा करणे शक्य होणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्याकडून ४०७ वाहन प्राप्त झाले आहे. तर स्थानिक आमदार निधीतून ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली आहे.