सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले कॉलेज यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एम.फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. बी.फार्मसीनंतर एम.फार्मसी अभ्यासक्रमही जिल्ह्यात सुरू करून भोसले फार्मसी कॉलेजने औषध निर्माण क्षेत्रातील उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून दिले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी दिली. यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी विशेष परीश्रम घेतल्याचे ते म्हणाले.
शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जाहीर वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी १० ते १६ डिसेंबर कागदपत्रे पडताळणी १० ते १७ डिसेंबर तात्पुरती गुणवत्ता यादी १९ डिसेंबर हरकती नोंदविणे २०व २१ डिसेंबर, अंतिम गुणवत्ता यादी २३ डिसेंबर प्रवेशाची पहिली फेरी २४ ते २६ डिसेंबर, पहिली प्रवेश यादी जाहीर ३० डिसेंबर, प्रवेशाची दुसरी फेरी ४ व ५ जानेवारी व दुसरी प्रवेश यादी ७ जानेवारीला जाहीर होईल. प्रवेशाच्या दोनच फेऱ्या असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल. एम.फार्मसी अभ्यासक्रमासाठी कॉलेजमधील सर्व प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. उच्चशिक्षित, अनुभवी प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विभागप्रमुख म्हणून फर्मास्युटिक्स विषयात पीएचडी असलेले डॉ. दत्तात्रय शिनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. फार्मसी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश अर्ज भरावा,असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले आहे.