*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग १३*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण *पराशर* स्मृतिमधील काही श्लोकांचा विचार करणार आहोत .
*धर्मो जितो ह्यधर्मेण जितः सत्योSनृतेन च ।*
*जिता भृत्यैस्तु राजानः स्त्रीभिश्च पुरुषा जिताः ॥*
( कलियुगात ) अधर्माने धर्माला जिंकले आहे , खोट्याने सत्याला जिंकले आहे , सेवकांनी राजास जिंकले आहे व स्त्रियांनी पुरुषास जिंकले आहे !
यातील चूक शोधून सापडणार नाही ना ? त्या काळात म्हणजे कृष्णजन्माचे आगोदर पराशरांनी आपला पुत्र व्यासमुनिंना सांगितलेला विचार आहे . युगांचेही पलिकडे पहाण्याची दृष्टी त्यांची होती , हे तर स्पष्ट होतेच . आणि त्यांचेवर शिंतोडे कोण उडवते ? ज्याला परवा काय खाल्लं ? हे आठवत नाही !! छानच जगतो आपण !😃😃
*लवणं मधु तैलञ्च दधि तक्रं घृतं पयः ।*
*न दूष्येच्छूद्रजातीनां कुर्यात् सर्वस्य विक्रयम्॥*
लवण ( मीठ ) , मध , तेल , दही , ताक , तूप आणि दूध हे शूद्र जातीच्या स्पर्शाने दूषित होत नाही . त्यांनी त्याची विक्री करावयास हरकत नाही .
या श्लोकाने शूद्राचे हीनत्वच काढून टाकले आहे , असे भासत नाही का ? हा शूद्राच्या श्रीमंतीचा जसा विचार आहे तसाच गोपालनाचे महत्व समाजाच्या शेवटच्या स्तरा पर्यंत नेणारा विचार वाटत नाही कुणाला ? सर्व समाजास लागणार्या गरजेच्या वस्तूंचा विक्रयच करण्याची परवानगी नियमाने मिळत असेल तर नीतिशास्त्रकारांचा वाईटपणा कोणता असू शकतो ? खचितच नाही !
*प्राप्नोति सूतकं गोत्रं चतुर्थपुरुषेण तु ।*
*दायाद्विच्छेदमाप्नोति पञ्चमो वात्मवंशजा ॥*
गोत्रात चौथी पीढीपर्यंत सूतक चालते . आपल्या वंशातील पाचवा पुरुष त्या सूतकापासुन विच्छेदास पात्र आहे .
आमच्याकडे सातआठ पिढ्या झाल्या तरी पिढी तोडली जात नाही . सूतक धरले जाते . माणसे अडकून पडतात . नावे ठेवली जातात . म्हणून हा श्लोक देण्याचे प्रयोजन आहे .
*यं यज्ञसंघैस्तपसा च विद्यया*
*स्वर्गैषिणो वात्र यथैव विप्राः ।*
*क्षणेन यान्त्येव हि तत्र वीराः*
*प्राणान् सुयुद्धेन परित्यजन्तः॥*
या लोकात स्वर्गाची इच्छा करणारे ब्राह्मण असंख्य यज्ञ , तप आणि विद्येद्वारा जिथपर्यंत कसेबसे पोहोचतात , तिथपर्यंत उत्तम युद्धात प्राणांचे बलिदान करणारे वीर क्षणात पोहोचतात .
खरंच , आपण एखाद्या ब्राह्मणापेक्षा बलिदान देणार्या वीराचं ( शहीद ) गुणंगान किती गातो ना ! हेच जर स्मृतीत सांगितले असेल तर स्मृति वाईट का ?
*द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमण्डलभेदिनौ ।*
*परिव्राङ्योगयुक्तश्च रणे चारिमुखे हतः ॥*
या लोकात दोन पुरुष सूर्यमण्डल भेदन करणारे असतात ( सूर्यमण्डलभेदनाचा माझा साधा अर्थ , ज्याच्या सद्गुणांचा उल्लेख त्याचे मृत्युपश्चात वारंवार होतो ! 🙏) १)योगयुक्त सन्यासी व २) समोरासमोर युद्ध करुन मेलेला क्षत्रिय .
किती खरेपणा आहे या श्लोकात ? आज ही आम्ही अब्दुल हमीद या वीराचे नाव गर्वाने घेतोच ना ! *रणात मरणे म्हणजे मुक्ति । सार्थ कराया गीता उक्ति । क्षात्रधर्म तो राखू जगती । अनासक्त होवुनी ॥* या माझ्या वडिलांच्या काव्यपंक्ति मला आठवल्या नाही तर मी पुत्र कसा ? याही श्लोकात उत्तम क्षात्रधर्मच समजावलाय ना ? तसेच सध्याच योगी आखाडा साधू *कल्पवृक्ष गिरी महाराज व त्यांचे शिष्य आणि ड्रायव्हर* यांची निर्घृण निर्मम हत्या झाली आणि ती ही पोलिसांसमोर ! त्यांचीही नावे सातत्याने घेतली जातीलच ! ( त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹) असे असेल तर स्मृति वाईट कशा ?
विनंती इतकीच , *पराशर* स्मृति वाचनीय आहे . उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
*पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६*
*९८२३२१९५५०/८८८८२५२२११*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹