आंबोली सैनिक स्कूलचा २० वा वर्धापन दिन उत्साहात
लेफ्टनंट कर्नल एम . सी . मुथण्णा व उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी यांचा सत्कार व शाळेच्या वार्षिक विशेषांकाचे
प्रकाशन !
आंबोली :
आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा २० वा वर्धापन दिन दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकमाचा शुभारंभ मा. एम. नवकिशोर रेडडी उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाला. दि. २२ डिसे. २०२३ रोजी लेफ्टनंट कर्नल एम.सी. मुथण्णा कमांडींग ऑफ्सिर १ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन, शाळेचे संस्थापक मा. ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, सुभेदार मेजर दिनेश गेडाम ५८ एन . सी . सी . बटालियन यांच्याप्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करून वर्धापन दिनाचा समारोप करण्यात आला.
कार्यकमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक व बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. एस. नवकिशोर रेडडी उपवनसंरक्षक, सावंतवाडी, मा. विद्या घोडके वन अधिकारी आंबोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यकमाची सुरूवात गणेश वंदनाने झाली. मराठी आणि हिंदी गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर केले. लुंगी डान्स नृत्यप्रकाराने सर्वांची मने जिंकली. शिवाजी महाराज्यांच्या जीवन चरित्रावरील नृत्याने वातावरण भारून गेले .
वर्षभरात क्रिडाप्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मच्या-यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये बेस्ट टिचर श्री. ह्यषिकेश गावडे, श्री. मायाप्पा शिंदे, शिक्षण निदेशक श्री . शिवराज पवार, क्रीडा शिक्षक श्री. मनोज देसाई, श्री. सतिश आईर, श्री. अनिकेत पाटील, अधिक्षक श्री. रूपेश आईर, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. शरद जाधव व शिक्षकेतर कर्मचारी श्री. बाबुराव झाडे यांचा सत्कार करण्यात आला .इयत्ता ६वी प्रथम कमांक प्राप्न कॅडेट देवेश परब, इयत्ता ७वी कॅडेट सतेज पाटील, इयत्ता ८वी निल हेगीष्टे, इयत्ता ९वी सोहम वो-हाडे, इयत्ता ११वी अॅलेक्स सावंत या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील गटात कॅडेट समाधान गोरे, १७ वर्षाखालील गटात कॅडेट गौरेश सावंत, जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा १४ वर्षाखालील गटात कॅडेट अशोक घोडके, १७ वर्षाखालील गटात कॅडेट तेजस पाटील, १९ वर्षाखालील गटात कॅडेट पारस शिंदे, युवती मुखर्जी फुटबॉल कप जिल्हास्तरीय ज्युदो, अॅथलेटिक्स स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे • नवकिशोर रेड्डी यांनी स्पर्धापरिक्षांबददल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी २२ डिसें. २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता लेफ्टनंट कर्नल एम.सी. मुथण्णा कमांडींग ऑफिसर १ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, सुभेदार मंजर दिनेश गेडाम ५८ एन. सी. सी. वटालियन यांचे सैनिक स्कूलच्या आवारात आगमन झाले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रमूख पाहूण्यांना करून दिली. त्यानंतर प्रमूख पाहूण्याचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देवून उत्कृष्ठ सैनिकी संचलन सादर केले. त्यानंतर छोटया सैनिकांनी ॲरोबीक्स, झांज प्रात्यक्षिक, ज्युदो कराटे, मल्लखांब, लेझिन, व्हॅलिकॉसिंग व ऑबस्टॅकल्स् इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली. या साहसी प्रात्यक्षिकांनी प्रमुख अतिथी व पालकांची मने जिंकली.
सर्व मान्यवरांचे शाळेचे प्राचार्य नितीन गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचा वार्षिक विशेषांक ‘वेधचे प्रकाशन प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरणामध्ये शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जेई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कॅडेट यश एकंडे, कॅडेट सुजल गवस, कॅडेट सुजल साटेलकर तसेच इयत्ता १०वी बोर्ड परिक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट तनुप राऊत, व्दितीय क्रमांक कॅडेट गौरेश नाईक, तृतीय क्रमांक कॅडेट निल पांचाळ इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट सुजल साटेलकर, व्दितीय क्रमांक कॅडेट अविष्कार पाटील, तृतीय क्रमांक कॅडेट दत्तराज नराम, ऑलंपियाड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवरील कुराश खेळातील सहभागी गुणवंत खेळाडू, जिल्हापातळीवरील गुणवंत धावपटू यांचा सत्कार करण्यात आला. वेस्ट हाऊस इन अॅकॅडेमिक्स सिंहगड हाऊस, वेस्ट हाऊस इन स्पोर्टस् प्रतापगड हाऊस, वेस्ट हाऊस इन को – करिकुलर अॅक्टीव्हिटिज् विशालगड हाऊस, वेस्ट हाऊस इन ऑवस्टॅकल्स् रायगड हाऊस, चॅपियन हाऊस ऑफ द इयर म्हणून विशालगड हाऊसची निवड करण्यात आली. तसेच वेस्ट कॅडेट म्हणून कॅडेट अॅलेक्स सावंत व वेस्ट स्पोर्टस्मन म्हणून कॅडेट श्रेयश शिर्के यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी लेफ्टनंट कर्नल एम. सी. मुथण्णा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतूक केले. सैनिक स्कूलच्या भौतिक सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी स्वयंपुर्ण व्हावे असे आवाहन केले. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली ते निश्चितच कौतूकास पात्र आहेत. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशिक्षकांनी किती परिश्रम घेतले असतील याची प्रचीती येते. या शाळेने आपला विद्यार्थी सर्वगुण संपन्न करण्याचा संकल्प केलेला आहे असे दिसून येते. अल्पावधित या शाळेने उंच झेप घेतली आहे याचा शाळेतील विद्यार्थी व पालकांना अभिमान असायला हवा. एन.डि. ए. परिक्षेत अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी, संबंधित शिक्षक आणि पालकवर्ग या सर्वाचे योगदान असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.
सैनिक स्कूलचे संस्था सेक्रेटरी मा. सुनिल राऊळ म्हणाले जास्तीत जास्त मूलांचे भवितव्य घडविण्याचे महान कार्य या सैनिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहे. याचा सार्थ अभिमिन मला, विद्यार्थी व पालकांना असायला हवा. १० वी १२ वी च्या शालान्त प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सैनिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागतो याचे श्रेय येथील सर्व शिक्षकांना जाते. या शाळेमधून देश सेवेसाठी मोठया प्रमाणात सैन्य अधिकारी होण्यासाठी एन.डि. ए. परिक्षेत अधिकाधीक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पाहिजेत.
.
अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडियर सुधिर सावंत यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पालकांनी मुलाचे केलेले कौतुक महत्वाचे आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्यात सैनिक स्कूलची स्थापना मानाचा तुरा आहे असे सांगितले . राज्यातील सैनिक स्कूलमधून विद्यार्थ्याचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी शासनाने स्थापन केलेल्या कमिटीच्या माध्यमातून प्रयत्नशिल असल्याचे सांगितले सैनिक स्कूलच्या माध्यमातून ऑलंपिकसाठी खेळाडू घडावेत याच्यासाठी शासनाने सर्व क्रीडा साहित्य मंजूर करावे असे सुचविले. राष्ट्रभक्तीची संस्कृती शिवरायांच्या प्रेरणेने रुजावी सैनिक स्कूल मधून योध्दे बनावेत असा आशावाद व्यक्त केला.
आभार प्रदर्शन प्राचार्य नितीन गावडे यांनी केले. इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी ऑबस्टॅकल प्रात्याक्षिके सादर केली . सुत्रसंचालन श्री . ऋषिकेश गावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था सेक्रेटरी श्री. सुनिल राऊळ, संचालक ऑ. कॅप्टन श्री. दिनानाथ सावंत, श्री. जॉय डॉन्टस, श्री. शिवाजी परव, श्री. विनायका शेणई श्री. राजाराम वळंजू, सैनिक नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री . बाबुराव कविटकर, ऑ. कप्टन श्री. सुभाष सावंत, श्री. तातोबा गवस, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, श्री. शशिकांत गावडे, श्री. श्रीधर गावडे हे प्रमुख गावकर सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय नार्वेकर पालक प्रतिनिधी सौ. संजना पेडणेकर श्री. युवराज चव्हाण, सौ. तेजस्वीता पाताडे, सौ. चैतन्या सावंत, सौ. गंधाली मुंडले, श्री. नारायण चेंदवणकर, श्री. धनाजी गंगावणे, पत्रकार श्री. विजय राऊत श्री. अनिल चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आंबोली ग्रामस्थ, समस्त पालकवर्ग व पंचकोशीतील आजी माजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.