You are currently viewing अजातशत्रू सुरेश परब वाढदिवस अभिष्टचिंतन !

अजातशत्रू सुरेश परब वाढदिवस अभिष्टचिंतन !

 

कर्तृत्ववान, शांत, संयमी, दिलदार, परोपकारी, जिवाला जीव देणारा सखा…असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सुरेश ने शून्यातून विश्व निर्माण केले. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला, व्यवसायात व राजकारणात काम करत असताना एक अजातशत्रू अशी आपली प्रतिमा निर्माण केली. आम्हा सर्व मित्रमंळींना आमच्या कुटुंबातील जेष्ठ सदस्य असल्याचे स्नेहसंबंध सुरेश ने निर्माण केले. गोरगरीबांना आधारवड वाटणारा असा हा अजातशत्रू माणूस… सुरेश ने आपल्या लाघवी स्वभावाने मैत्री चे विश्व निर्माण केले कोणत्याही सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणारा, अडल्या नडल्याच्या प्रसंगाला धावून जाणारा असा हा आमचा जिवलग मित्र, एक आदर्श कुटुंबवत्सल माणुस…सुरेश चा वाढदिवस म्हणजे आम्हा सर्व मित्रमंडळीचा उत्सव असतो आणि डिसेंबर महिन्यातील आल्हाददायक वातावणात सर्वजण एकत्र जमून कुठेतरी निसर्गाच्या कुशीत मायेच्या ओलाव्यात वाढदिवस साजरा करतो !

अशा ह्या अजातशत्रू सुरेशला परमेश्वराने दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य देऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात हिच आजच्या शुभदिनी परमेश्वराकडे प्रार्थना..🙏🏻

*संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*

*सावंतवाडी*

प्रतिक्रिया व्यक्त करा