You are currently viewing गोरा गोरापान

गोरा गोरापान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम बालगीत -*

*गोरा गोरापान*

इटुकला पिटुकला, छकुला छान छान
घारे डोळे गाल गोबरे, गोरा गोरा पान //धृ //

नकटे छोटे नाक , कुरळे कुरळे केस
रुबाबदार राहतो, पेहराव सुंदर ड्रेस
येते कुठून शहाणपण , आहे जरी लहान
घारे डोळे गाल गोबरे , गोरा गोरा पान //१//

दुडूदुडू पळतोय , खेळतोय घरीदारी
घोड्यावर सवारी , त्याची ऐट लय भारी
सैनिक मागे सारे , पुढे शंभूराजे सान
घारे डोळे गाल गोबरे, गोरा गोरा पान //२//

आई बाबा आजी आजोबा , सारे फिरे मागेपुढे
साऱ्यांना चकवतो , पळतो इकडे तिकडे
दमूनभागून झोपतो , गोष्ट ऐकून छान
घारे डोळे गाल गोबरे , गोरा गोरापान //३//

कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा