*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नदी*
निर्झर नूतन
निर्मळ पावन
मिरवित आनंद केतन
दुडुदुडू धावत जाई …..
डोंगर उतरणी
उतरत मनहरणी
पार करत अडचणी
गाणे हासत गाई …..
संगीसाथी भेटले
नदीरुप घेतले
पुढेपुढे वाहू लागले
कशाची हिला घाई ? …..
अंगणी उतरे
तरंगिणी लहरे
प्रवाह जोर धरे
संथ वहा ऽ कृष्णामाई ….
विजया केळकर_______
नागपूर