*घावनळे विभागात विकास कामांचा धडाका*
*आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने*
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून घावनळे विभागात अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली असून रविवारी त्यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामे मार्गी लावण्याचा आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द मार्गी लावला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यामध्ये घावनळे खुटवलंवाडी कानडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, घावनळे खोचरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, घावनळे आईनमाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,घावनळे माश्याचीवाडी येथे स्ट्रीटलाईट बसविणे, मोरे गावातील बांदेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ३० लाख हि कामे आ. वैभव नाईक यांनी मंजूर केली असून सर्व कामांची भूमिपूजने करण्यात आली आहेत.
यावेळी मोरे येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रमा ताम्हाणेकर, दीपक आंगणे,रामभाऊ धुरी, अंकुश धुरी,शाखा प्रमुख प्रकाश सावंत, भाई बांदेकर, विठ्ठल दळवी, काशीराम खरुडे, सदा बांदेकर,राजू तामाणेकर,बंटी भिसे, संतोष लाड आदींसह मोरे गावातील ग्रामस्थ.
घावनळे येथे माजी सरपंच दिनेश वारंग, सरपंच आरती वारंग, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, दीपक सावंत, गाव संघटक नाना कोरगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, माजी सोसायटी चेअरमन विद्यमान सदस्य जयराम सुद्रिक, युवासेना उपविभाग प्रमुख निलेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव,श्रद्धा तावडे, स्वरा धुरी, महादेव कोरगावकर, योगेश पारकर, प्रवीण कदम, बुवा आनंद कानडे आणि कानडे परिवार, बाळा साउल, आनंद नेवगी, सचिन कोरगावकर, सत्यवान परब, मधु घाडी, वैभव सावंत, समीर धुरी, सत्यवान वारंग, विशाल वारंग, दिगंबर वारंग, अनील वारंग, तुळसुलकर, कोरगावकर, नेवगी, राऊळ, पारकर, कानडे आदी असंख्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.